दसऱ्याच्या निमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी नवचैतन्य, पाचशे वाहनांची बुकिंग, ७० वाहनांची डिलव्हरी

प्रकाश बनकर
Sunday, 25 October 2020

साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या दसरा सणानिमित्ताने बाजारपेठेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहेत. कोरोनामुळे सहा महिन्याहून अधिक काळ बाजारपेठा बंद होत्या.

औरंगाबाद : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या दसरा सणानिमित्ताने बाजारपेठेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहेत. कोरोनामुळे सहा महिन्याहून अधिक काळ बाजारपेठा बंद होत्या. दसऱ्यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. दसऱ्यांच्या मुहूर्तावर सोने-चांदी,वाहन, आणि घर खरेदी शुभ मानली जाते. या नवरात्सोवात जवळपास पाचशे चारचाकी वाहनाची व दीड हजारहून अधिक दुचाकी वाहनांची बुकिंग झाली आहे. रविवारी (ता.२५) दसऱ्यांच्या मुहूर्तावर या वाहनांची डिलेव्हरी देण्यात येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

कोचिंग क्लासेस एक नोव्हेंबरलाच सुरु करु, कारवाई केली तर संघटनेनेचा आत्मदहनाचा इशारा

ऑटोमोबाईल
दसऱ्या निमित्ताने चारचाकी वाहन कंपन्यांनी बंपर ऑफर जाहीर केल्या आहेत. यासह बँकानंही व्याजदर कमी केल्याने नवरात्र सुरू झाल्यापासून बुकिंग वाढल्या. दसऱ्यांची दिवशी पाचशे चारचाकी वाहना विक्री होणार आहेत. तर दिड हजारहून अधिक दुचाकीची बुकिंग झाली आहेत. बीएस-६ प्रणालीचे वाहने विक्रीसाठी आल्याने किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन प्रणालीच्या तुलनेत ही वाढ तुरळक आहे. मात्र दसऱ्या निमित्ताने वाहन मार्केट चांगले राहणार आहेत. कोट्यवधी रुपयांचा उलाढाल यातून होईल. अशी माहिती ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञ विकास वाळवेकर यांनी सांगितले.

बांधकाम क्षेत्र
लॉकडाऊननंतर आता काही पुर्वपदावर येणारे रियल ईस्टेट क्षेत्रात चैतन्याचे वातावरण आहे. सरकारने नोंदणी शुल्कात (रजिस्ट्री) दिलेली सूट, एक टक्का जीएसटीमुळे घर खरेदी घराची विचारणा वाढली आहे. क्रेडाईच्या सदस्याचे सुरु असलेल्या विविध प्रकल्पातून रोज एक ते दोन घरांची बुकिंग होत आहेत. तर दसऱ्यांच्या मुहूर्तावर जवळपास शंभरहून अधिक गृहप्रवेश होणार आहे. कोरोनाच्या संकाटात आलेला हा दसऱ्या बांधकाम व्यवसायिकांना आधार देणारा ठरत आहेत. अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष नरेद्रसिंग जाबिंदा यांनी सांगितले. तसेच सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे सोने-चांदीचे मार्केट चांगले राहणार असल्याचा विश्‍वास सराफा राजेंद्र मंडलिक यांनी व्यक्त केला आहे.
 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On Dasara Boom In Market Aurangabad News