गंगापूरमध्ये रस्त्यांवर गर्दी, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. व्यापारीदेखील काळजी घेत नाहीत. दुकाने पाच वाजता बंद करण्याचा नियम आहे; मात्र तीही सायंकाळी सहा-साडेसहापर्यंत सुरू असतात.

गंगापूर, (जि. औरंगाबाद) : शहर व तालुक्‍यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रोज पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या वाढत आहे. यात व्यापाऱ्यांना नसलेले गांभीर्य, नागरिकांची बेफिकिरी वृत्ती, प्रशासनात समन्वयाचा अभाव, आरोग्ययंत्रणेवर पडत असलेला ताण या साऱ्या बाबींमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढते की काय, अशी भीती व्यक्‍त होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा लॉकडाउन करण्याची मागणी जोर धरत आहे. 

गंगापूर शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातील लोकांची या-ना त्या कारणामुळे येथे सतत मोठी वर्दळ असते. शासनाने अनलॉक-१ करण्याच्या अगोदरपासून गंगापुरातील बाजारपेठ सुरू झाली. सुरवातीला सर्वच व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करण्याची हमी दिली; मात्र प्रत्यक्षात कोणताच व्यापारी व नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत नाही.
भाजी-बाजारात पहाटे भाजी खरेदीला सुरू झालेली गर्दी सायंकाळपर्यंत कायम असते. प्रत्येक दुकानासमोर गर्दी दिसत आहे. यामध्ये जवळपास पन्नास टक्‍के लोक विनामास्क असतात.

चीनमुळे जगाचं खूप मोठं नुकसान; ट्रम्प यांचा पुन्हा हल्लाबोल

सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. व्यापारीदेखील काळजी घेत नाहीत. दुकाने पाच वाजता बंद करण्याचा नियम आहे; मात्र तीही सायंकाळी सहा-साडेसहापर्यंत सुरू असतात. गर्दीमुळे भाजीपाल्याचे लिलाव बंद करून शहरात फिरून भाजी विक्री करण्याचा नियम केला आहे; मात्र अनधिकृतपणे शहरात पाच ते सात ठिकाणी प्रचंड गर्दी भाजीसाठी झालेली असते. याकडे
कोणाचेच लक्ष नाही. पोलिस त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. 

पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात शिरला कोरोना; काल परराष्ट्रमंत्री तर आज खुद्द...
  

कोरोनाला हरवायचे असेल तर सामाजिक अंतर राखा. मास्कचा वापर करा. हे गरजेचे आहे. समोर उभा असलेला प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे असे समजून आपण जर प्रत्येक व्यक्तीपासून तीन फूट अंतर राखून राहिलो तर कोरोनावर मात करणे शक्य आहे. 
- डॉ. श्रीनिवास तौर, बालरोगतज्ज्ञ 
  

 

तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा 
  

  • एकूण संक्रमित रुग्ण : १८५ 
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : १३६ 
  • उपचार घेत असलेले रुग्ण : ४१ 
  • एकूण मृत्यू : ०२ 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for lockdown at Gangapur