डेप्युटी सीईओंची भटकंती थांबली, सदस्यांनी सोडवला दालनाचा प्रश्न

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 10 December 2020

नवनिर्मित दालनावरून होत असलेल्या राजकारणामुळे डेप्युटी सीईओ शिरीष बनसोडे यांनी दालनाचा त्याग केला होता.

औरंगाबाद: नवनिर्मित दालनावरून होत असलेल्या राजकारणामुळे डेप्युटी सीईओ शिरीष बनसोडे यांनी दालनाचा त्याग केला होता, जिल्हा परीषदेतील इतर डेप्युटी सीईओंच्या दालनातून ते कामकाज करत होते, ही बाब सदस्यांना खटकल्यानंतर बुधवारी स्थायी समितीच्या सभेत त्यांनी बनसोडे यांचे दालन आणि महिला कक्षाचा प्रश्न सोडवला, त्यामुळे बनसोडे यांच्या भटकंतीला पूर्णविराम मिळाला आहे.

 कोरोना काळात एकीकडे विकासकामांच्या निधीला कपात लावण्यात आली असताना, बनसोडे यांनी महिला कक्षात लाखोंचा खर्च करून आलिशान दालन करून घेतले. महिला कक्षात दालन थाटण्यावरून महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण, तसेच नूतनीकरणाचे काम करताना चांगले साहित्य काढून, निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचा आरोप करत, या कामाची चौकशीची मागणी माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे पाटील यांनी मागील स्थायी समितीत केली होती.

Corona Updates: औरंगाबाद जिल्ह्यात ६७ नवीन कोरोना रुग्ण

महिला कक्ष न दिल्यास नव्या दालनाला कुलूप ठोकण्याचा इशारा सभापती अनुराधा चव्हाण यांनी दिला होता. दालनावर राजकारण सुरू झाल्याने बनसोडे यांनी दालनाचा त्याग करत, सामान्य प्रशासनच्या कार्यालयीन अधीक्षकांच्या दालनातून कामकाज सुरू केले होते. आपल्या नावाची पाटीही लावून घेतली होती. तसेच सदस्य व कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी सामान्य प्रशासन विभागात त्यांच्या दालनाकडे जाणारा मार्ग दर्शवणारे फलकही लावले होते. मात्र या दालनात त्यांचे मन काही रमले नाही. त्यामुळे त्यांनी या दालनावर ठोकलेली पाटी काढून घेण्याचे सांगत, जि.प.तील इतर विभागांच्या डेप्युटी सीईओंच्या दालनात बसून कामकाज सुरू केले होते.

सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालय होणार लवकरच सुरू

 बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत केशवराव तायडे पाटील यांनी बनसोडे यांची भटकंती सभागृहासमोर मांडत, त्यांना त्याच दालनात बसवावे, त्यांच्या जुन्या दालनात सुरू केलेला कोविड-१९ कक्ष जि.प. शाळेत स्थलांतरीत करावा, अशी मागणी केली. सदस्य मधुकर वालतुरे यांनीही डेप्युटी सीईओंना सन्मानाने दालनात बसवू, पण महिला कक्षासाठी काय निर्णय घेणार, महिला कक्षासाठी जागा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy CEO got home zp members solved the problem