सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालय होणार लवकरच सुरू

माधव इतबारे
Thursday, 10 December 2020

सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय शहरासह मराठवाड्यातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. दरवर्षी लाखो पर्यटक याठिकणी भेट देतात.

औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरू करण्यात आली असली तरी सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय अद्याप सुरू झालेले नाही. उद्यान व प्राणिसंग्रहालय सुरू करण्यासाठी नियमावलीचा अभ्यास सुरू असून, दोन दिवसात यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कोरोना संसर्गामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय बंद आहे. त्यामुळे महापालिकेला लाखों रुपयांचा फटका बसला. दरम्यान कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय कधी सुरू होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

देवळाई परिसरात ५ घरफोड्या, आठ तोळ्याच्या दागिन्यांसह ६८ हजारांची रोकड चोरली

सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय शहरासह मराठवाड्यातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. दरवर्षी लाखो पर्यटक याठिकणी भेट देतात. दरम्यान उद्यान व प्राणिसंग्रहालय केव्हा सुरू होणार याविषयी अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सांगितले की, शासनाने पर्यटन स्थळे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. महापालिकेच्या अखत्यारीत असलेले सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय लवकर सुरू होणार आहे. पर्यटकांसाठी नियम आणि अटी काय असाव्यात यावर चर्चा सुरू असून, प्रशासक आस्तिककुमार पांडेय निर्णय घेणार आहेत. 
शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात, रावसाहेब दानवेंचा खळबळजनक आरोप

नऊ महिन्यात दुरुस्तीची कामे-
नऊ महिन्यांपासून सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद होते. या काळात महापालिकेने डागडुजीचे कामे हाती घेतली होती. प्राणिसंग्रहालयातील मोडकळीस आलेले पिंजरे दुरुस्त करण्यात आले. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने पिंजऱ्यांच्या दुरुस्तीसह इतर कामे करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या होत्या. त्यानुसार कामे करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 
(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddharth Park and Zoo to be restart soon