साधे ट्विट सुद्धा अख्ख्या विरोधी पक्षाला धडकी भरवते, असे म्हणत धनंजय मुंडेंनी संजय राऊतांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

गणेश पिटेकर
Sunday, 15 November 2020

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा आज रविवारी (ता.१५) वाढदिवस आहे. सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी श्री राऊत यांना ट्विट करुन शुभेच्छा दिल्या.

औरंगाबाद : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा आज रविवारी (ता.१५) वाढदिवस आहे. सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी श्री राऊत यांना ट्विट करुन शुभेच्छा दिल्या. ट्विटमध्ये ते म्हणतात, की ज्येष्ठ शिवसेना नेते तथा सामानाचे कार्यकारी संपादन संजय राऊतजी आपणास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपले अग्रलेख, मुलाखती अगदी एक साधे ट्विट सुद्धा अख्ख्या विरोधी पक्षाला धडकी भरवते. आपली लेखणी अशीच तळपत राहो! श्री मुंडे पोटदुखी नुकतेच मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांनी व्हिडिओ ट्विटकरुन नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया : अवांतर शुल्क पाहून विद्यार्थी आवाक; हॉस्टेल, मेस केली सक्तीची

 

Dhananjay Munde@dhananjay_munde
ज्येष्ठ शिवसेना नेते @SaamanaOnlineचे कार्यकारी संपादक, खा.@rautsanjay61जी  आपणास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपले अग्रलेख, मुलाखती, अगदी एक साधे ट्विट सुद्धा अख्ख्या विरोधी पक्षाला धडकी भरवते. आपली लेखणी अशीच तळपत राहो!

 

 

तसेच शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनाही शुभेच्छा दिल्या. ट्विट शुभेच्छांमध्ये ते म्हणतात, शिवसेना नेते आदरणीय संजय राऊत यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ! आपल्या लेखणीची धार कायम तळपत राहो, आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, ही आई भवानी चरणी प्रार्थना.

Ambadas Danve@iambadasdanve
शिवसेना नेते आदरणीय @rautsanjay61 यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! आपल्या लेखणीची धार कायम तळपत राहो, आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, ही आई भवानी चरणी प्रार्थना. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde Give Birthday Wish To Sanjay Raut