esakal | वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया : अवांतर शुल्क पाहून विद्यार्थी आवाक; हॉस्टेल, मेस केली सक्तीची
sakal

बोलून बातमी शोधा

Medical Process

राज्यात वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात दोन-तीन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी आपले फिस स्ट्रक्चर वेबसाइटवर अपलोड केले आहे. अनेक महाविद्यालयांनी हॉस्टेल व मेस सक्तीची केली आहे.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया : अवांतर शुल्क पाहून विद्यार्थी आवाक; हॉस्टेल, मेस केली सक्तीची

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : राज्यात वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात दोन-तीन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी आपले फिस स्ट्रक्चर वेबसाइटवर अपलोड केले आहे. अनेक महाविद्यालयांनी हॉस्टेल व मेस सक्तीची केली आहे. त्याला लाखोंची डिपॉझिटही लावले आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे हे फिस स्ट्रक्चर पाहून आवाक होण्याची वेळ विद्यार्थी व त्यांच्या पालकांवर आली आहे. गुणवंत असूनही केवळ अशा अवांतर शुल्कामुळे गरीब विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहतात की काय, अशी भीती आहे. शासनाने अशा अवांतर शुल्कावर नियंत्रण आणून ‘सक्ती’चे हे प्रकार बंद करण्याची गरज आहे.

Diwali Lakshmi Pujan 2020 : दिव्यांच्या रोषणाईत लक्ष्मीपूजन, झेंडूच्या फुलांच्या तोरणमाळा अन् सप्तरंगी रांगोळ्यांनी सजले अंगण


राज्यात वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारी (ता. १२) हा प्रवेश अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. पंधरा वीस दिवसांपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पण, राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी आपले फिस स्ट्रक्चर वेबसाइटवर टाकलेले नव्हते. त्यामुळे किती शुल्क भरावे लागणार हे विद्यार्थ्यांना कळत नव्हते. दोन-तीन दिवसांपूर्वी हे फिस स्ट्रक्चर अपलोड केले आहे. राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना ट्यूशन फिस व डेव्हलपमेंट फिसवर निर्बंध आहेत. पण, महाविद्यालयांनी अव्वाच्या सव्वा अवांतर शुल्क आकारले आहे.


गरीब विद्यार्थी एखादी खोली करून बाहेर मेस लावून किंवा हाताने स्वयंपाक करून वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतात. पण, राज्यातील या वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांचे हॉस्टेल व मेस सक्तीची केली आहे. इतकेच नव्हे तर ५० हजार ते तीन लाखापर्यंतचे शुल्क त्याला आकारले आहे. कॉशन मनी नावाखाली सरासरी एक लाख रुपये डिपॉझिट आकारले आहे. काही महाविद्यालयांनी लॉन्ड्री चार्जेसदेखील हजारोंच्या घरात आकारले आहे. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाची पुस्तके साडे चार ते पाच हजार रुपयांत विकत मिळतात. एका महाविद्यालयाने तर लायब्ररी शुल्क म्हणून ५० हजार रुपये आकारले आहेत. काही महाविद्यालयांनी तर महाविद्यालयात असलेल्या वेगवेगळ्या क्लबचे लाइफ टाइम मेंबर्स म्हणूनही लाखोच्या घरात शुल्क आकारले आहे. सरासरी एका विद्यार्थ्याला हे अवांतर शुल्क अडीच ते सात लाखापर्यंत भरावे लागणार आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.


वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी लक्ष घालावे
अवांतर शुल्काच्या माध्यमातून खासगी वैद्यकीय महाविद्यालये कोट्यवधी रुपयांची माया गोळा करणार आहेत. त्यात वेगवेगळे डिपॉझिट बीन व्याजी महाविद्यालयाकडे साडेपाच वर्षे राहणार आहे. यातील सक्तीचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. वैद्यकीय  महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये याकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


शासनाने महाविद्यालयांना ट्यूशन फिस व डेव्हलपमेंट फिस ठरवून दिली आहे. त्यावर निर्बंध आहेत; तसेच निर्बंध अवांतर शुल्कावर आकारण्याची गरज आहे. हॉस्टेल, मेस, क्लब फिस अशी कोणतीही सक्ती विद्यार्थ्यांना करू नये. हे अवांतर शुल्क पाहून अनेक गुणवंत विद्यार्थी दिलेले ऑप्शन रद्द करीत आहेत. याकडे शासनाने लक्ष द्यावे.
- भारत घोडके, पालक, लातूर

Edited - Ganesh Pitekar