esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Did You Know These Special Things About Dr Bheemrao Ambedkar

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित खास गोष्टी

बाबासाहेब करायचे योगा, त्यांच्या या पाच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

sakal_logo
By
विकास देशमुख

औरंगाबाद : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सतत अभ्यास, वाचन आणि लेखन करीत असत. हे सर्वश्रुत आहे; पण बौद्धिक संपदेइतकेच ते शरीरसंपदेलाही महत्त्व देत असत. शरीर सुदृढ असेल, आरोग्य उत्तम असेल तर ऊर्जा मिळते. हेच हेरून बाबासाहेब रोज व्यायाम आणि योगा करीत असत. त्यांच्याशी निगडित अशा काही खास गोष्टी eSakal.com च्या वाचकांसाठी.... 


 
मूळ आडनाव सकपाळ 

बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. वडील सुभेदार रामजी सकपाळ आणि आई भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४ वे अपत्य होते. त्यांचे नाव भीमराव असे ठेवण्यात आले. त्यामुळे कुणी भीम, भीमा व भिवा नावानेही त्यांना हाक मारत. बाबासाहेबांच्या कुटुंबीयांचे मूळ आडनाव सकपाळ असे होते. त्यांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे होते. आंबवडे या गावाच्या नावावरून त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेबांचे नाव नोंदविताना ‘आंबडवेकर’ असे आडनाव नोंदवले. 
 

Ambedkar Jayanti 2020 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जगात मापदंड ठरावी 

आंबवडेकर झाले ‘आंबेडकर’ 

साताऱ्याच्या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले आंबवडेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, असे त्यांनी भीमाला सुचविले. त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि बाबासाहेबांचे आडनाव आंबवडेकरचे ‘आंबेडकर’ झाले. तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून बाळ भीमाचे नाव आंबेडकर झाले. 
 

बालपणीच हरवले आईचे छत्र 

बाबासाहेबांचे वय अवघे पाच वर्षे असताना त्यांच्या आई भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. वर्ष १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली व ते सातारा येथे सुरवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसांनंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. 
 
पाचवीत असताना वाचले तथागतांचे चरित्र 

 
बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी हे कबीरपंथीय होते. बाबासाहेब चौथी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना दादा केळूस्कर यांनी स्वत: लिहिलेले ‘भगवान बुद्धाचे चरित्र’ हे पुस्तक भेट म्हणून दिले. पाचवीत असतानाच बाबासाहेबांनी तथागतांचे चरित्र वाचले. पुढे बाबासाहेब मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजममधून जानेवारी १९१३ मध्ये बीए झाले. मुंबई विद्यापीठाची ‘बीए’ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान बाबासाहेबांना मिळाला. 

go to top