विद्यापीठ गेटवर साहित्य जत्रा

अनिल जमधडे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त मंगळवारी (ता. 14) विद्यापीठ परिसरात जणू साहित्य जत्राच आवतरली होती. यानिमित्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या पुस्तक विक्रेत्यांनी फुले-शाहू-आंबेडकरी पुस्तकांचे प्रदर्शन भरवले होते. 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त मंगळवारी (ता. 14) विद्यापीठ परिसरात जणू साहित्य जत्राच आवतरली होती. यानिमित्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या पुस्तक विक्रेत्यांनी फुले-शाहू-आंबेडकरी पुस्तकांचे प्रदर्शन भरवले होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ गेट परिसरात पुस्तकांचे शंभरपेक्षा अधिक दुकाने थाटली होती. मुंबई, पुणे, नाशिक, नगर, नागपूर, वर्धा, अमरावती यासह विविध शहरातील पुस्तक विक्रेत्यांनी साहित्य उपलब्ध करून दिली होती. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवनावरील आधारित हजारो पुस्तके या ठिकाणी उपलब्ध होते. 

या पुस्तकांची विक्री 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आंबेडकरी साहित्यांना अधिक मागणी होती. डॉ. बाबासाहेबांचे "प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती', "बुद्ध अथवा कार्ल मार्क्‍स', "जातीचे निर्मूलन', "ब्राह्मणी परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज, ब्राह्मणी साहित्य', "प्रतिक्रांतीच्या समर्थनाचे तत्वज्ञान कृष्ण आणि त्याची गीता', "बहुजन चळवळ विचारसरणी आणि पक्ष संघटना',

त्याचप्रमाणे "महिला आणि अंधश्रद्धा', छत्रपती शिवाजी महाराज आणि आलेक्‍झांडर', "एकाकी आणि लोकाकी प्रज्ञासूर्य कॉ. शरद पाटील', "भीमा कोरेगावचे युद्ध', "राजर्षी शाहू महाराज आणि महिला मुक्ती', राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक व सांस्कृतिक कार्य', प्रियदर्शी सम्राट अशोकाचे शिलालेख', बहुजन चळवळ विचारसरणी आणि पक्षसंघटना' यासह इतर हजारो पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. 

भाजपकडून धर्माचे राजकारण 

आंबेडकरांच्या पुस्तकांना मागणी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध साहित्यांना प्रचंड मागणी असल्याची माहिती पुस्तक विक्रेते महाराष्ट्र बुक डेपोचे सुधाकर देवकर यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठोपाठ बुद्धांच्या साहित्यांना चांगली मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिवाय महात्मा फुले, शाहू महाराज, कार्ल मार्क्‍स, भारतीय संविधान या पुस्तकांची विक्री झाली. 

बाबासाहेबांचा आवाज बुलंद करा 

विद्यापीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव लागावे म्हणून ज्या अनेक वीरांनी प्राणांची आहुती दिली. त्यांना अभिवादन करण्यासाठी या भूमीत आले आहे. सम्यक उपजीविका करण्यासाठी जगण्यासाठी पुस्तकांचा स्टॉल लावला आहे. बाबासाहेबांनी स्वत:च्या हाताने शिक्षणाचा हा वृक्ष लावला आहे. बाबासाहेबांच्या कर्मभूमीतील या विद्यापीठाच्या परिसरात प्रचंड आल्यानंतर प्रचंड आनंद होतो आणि उर भरून येतो. प्रत्येक वर्षी या ठिकाणी येत राहील.  दिशा पिंकी शेख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. BabaSaheb Ambedkar Marathwada University Namvistar Din Aurangabad News