म्हणून विद्यापीठाच्या गेटवर येतात लाखो भीमसैनिक

अनिल जमधडे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर ग्रामिण भागातून आलेला अनुयायी विद्यापीठ गेटवर नतमस्तक होत होता. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी महिला उपासक-उपासिका तसेच मुले, वृद्धांनी रांगा लावल्या होत्या. या निमित्ताने विविध संस्था संघटनांनी आपले उपक्रम घेतले. 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्ताने विद्यापीठ गेट पसिरात अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता. राज्याच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी शहिदांचे स्मरण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनासाठी मंगळवार (ता. 14) सकाळपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येत होते. 

विद्यापीठ गेटवर नतमस्तक 

डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर ग्रामिण भागातून आलेला अनुयायी विद्यापीठ गेटवर नतमस्तक होत होता. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी महिला उपासक-उपासिका तसेच मुले, वृद्धांनी रांगा लावल्या होत्या. या निमित्ताने विविध संस्था संघटनांनी आपले उपक्रम घेतले. 

फोटोची मोठी विक्री 

विद्यापीठ गेट आणि मिलींद महाविद्यालयाच्या परिसरात चारही बाजूला विविध वस्तु, पुस्तके, फळे, खाद्य पदार्थांचे स्टाल लावण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्त्या तसेच फोटो विक्रीचे अनेक दुकाने लक्ष वेधून घेत होते. त्याचप्रमाणे निळे झेंडे, निळे रुमाल, हातातील कडे, निळे जॅकेट, गळ्यातील लॉकेट अशा विविध वस्तुंचे अनेक स्टॉल या ठिकाणी होते. प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यंदा पुस्तकांची विक्री अधिक प्रमाणा झाल्याचे बोधीपर्ण प्रकाशनचे देवानंद पवार यांनी सांगीतले. 

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

महिला सुरक्षा अन संविधान जागृती 

बार्टीच्या समता दुतांतर्फे पथनाट्यांचे सादरीकरण करुन संविधान जागृती, महिलांची सुरक्षा यावर माहिती देणाऱ्या नाटीका सादर केल्या. त्याचप्रमाणे बार्टीच्या विविध उपक्रमांची माहिती देणारा स्टाल लावण्यात आला होता. बार्टीच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे, प्रकल्प अधिकारी योगेश सोनवणे, बिलावर सय्यद सर्वेश्‍वर कोठूळे यांनी नागरीकांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचप्रमाणे राजीव गांधी कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सायबर क्राईमच्या अनुशंगाने महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांबद्दल जागृती केली. 

गायनातून बाबासाहेबांचा प्रचार 

विद्यापीठ गेट परिसरात ठिकठिकाणी गीतकार व गायकांनी भीम गितांच्या माध्यमाने प्रबोधनांचे सादरीकरण केले. यामध्ये अंध गायकांचा सहभाग मोठा असल्याचे दिसून आले. समता सैनिक दलातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 च्या विरोधात जनजागृती करणारा स्टॉल लावण्यात आला होता. बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न यातून करण्यात येत असून, त्याला विरोध करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत होते. 

रक्तदानाची तत्परता 

अमृता ब्लड बॅंकेतर्फे रक्तदानासाठी स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलवर अनेक ठिकाणाहून आलेल्या आंबेडकर अनुयायांनी स्वंयस्फुर्तीने रक्तदान करण्यात येत होते. समता सैनिक दलातर्फे शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा व विविध पक्ष संघटनांतर्फे नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. BabaSaheb Ambedkar Marathwada University Namvistar Din Aurangabad News