
दारुच्या नशेत असलेल्या तरुणाने जवळच असलेल्या कुत्रीवर फेकून मारला. यात कुत्रीला जीव गमवावा लागला. हे कृत्य करणाऱ्या तरुणाचे नाव यश बचके (वय १९) असे आहे.
औरंगाबादेत दारुच्या नशेत निर्दयी तरुणाने चाकू मारला फेकून, कुत्रीला गमवावा लागला जीव
औरंगाबाद : दारुच्या नशेत असलेल्या तरुणाने जवळच असलेल्या कुत्रीवर फेकून मारला. यात कुत्रीला जीव गमवावा लागला. हे कृत्य करणाऱ्या तरुणाचे नाव यश बचके (वय १९) असे आहे. कुत्रीच्या मालकाने त्याच्याविरोधात बुधवारी (ता.नऊ) छावणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पाणचक्की परिसरात लहान मुले खेळत होती. यावेळी एका कुटुंबाचे कुत्रेही होते. या दरम्यान यश बचके दारु पिऊन तिथे आला आणि हा चाकू कोणाला मारु असे मुलांना विचारु लागला.
काही वेळातच त्याने चाकू शेजारी बसलेल्या कुत्रीला फेकून मारला. यात तिचा जीव गेला. या घटनेची खेळत असलेल्या मुलांनी ताबडतोब कुत्रीच्या मालकाला सांगितले. या प्रकरणी मालकाने तात्काल छावणी पोलिस ठाणे गाठून सदर तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविली. याबाबत समजताच आरोपी फरार झाली आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
औरंगाबाद पेट लव्हर्स संघटनाची साथ
आरोपीच्या घरच्या लोकांच्या भीतीमुळे कुत्रीचे मालक तक्रार मागे घेण्याच्या विचार करत होते. मात्र औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या सदस्यांनी साथ देत तक्रार मागे न घेण्याचे सुचविले आहे. मृत कुत्री गरोदर होती, असे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले आहे. तरुणावर कलम ४२९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे संघटनेचे अध्यक्षा बेरील सँचिस यांनी माध्यमांना सांगितले. या कलमा अंतर्गत पाळीव प्राण्याचा जीव घेणे, मारहाण करणे, छेडछाड करणे हा गुन्हा असून या अंतर्गत आरोपीला पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते.
संपादन - गणेश पिटेकर