esakal | गळा चिरून तरुणाची हत्या; रक्ताने माखलेला मृतदेह पिंडीवर, औरंगाबाद जिल्ह्यातील खळबळजनक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_257

पैठण  शहरात एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.१०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गागाभट्ट चौकातील सिद्दीअली बाबाजवळील पुरातन महादेवाच्या गंगेश्वर मंदिरात घडली.

गळा चिरून तरुणाची हत्या; रक्ताने माखलेला मृतदेह पिंडीवर, औरंगाबाद जिल्ह्यातील खळबळजनक घटना

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : शहरात एका युवकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.१०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गागाभट्ट चौकातील सिद्दीअली बाबाजवळील पुरातन महादेवाच्या गंगेश्वर मंदिरात घडली. दरम्यान, निवारे हत्याकांडाचा तपास ऐरणीवर असताना शहरात पुन्हा एका हत्येची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक भागवत फुंदे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहे. घडलेल्या या घटनेचा तपासाची चक्रे पोलिसांनी फिरवली आहे. नंदू देविदास घुंगासे (वय २५) रा. कहारवाडा असे या हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.


या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गोरक्ष भामरे, पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यात सदर युवकाचा गळा तीक्ष्ण हत्याराने चिरला असल्याचे व तो महादेवाच्या पिंडीवर रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी युवकाचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून मृतदेह पैठण येथील सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.


हत्या की आत्महत्या का अंधश्रद्धेचा बळी?
दरम्यान, गोदावरीच्या काठी हे गंगेश्वर मंदिर पुरातन आहे. सदर युवकाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराचे निशाण आढळले. तो महादेवाच्या पिंडीवर पडल्याचे दिसून आल्यामुळे या प्रकाराबाबत प्रथमदर्शनी हत्या असल्याचे समोर आले असले तरी आत्महत्या किंवा अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला असावा यादृष्टीने ही पोलिस तपास करीत असल्याचे समजते.

Edited - Ganesh Pitekar