esakal | आयशर टेम्पोने दिली दुचाकीला धडक, अपघातात एकजण ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

चुकीच्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव-पांढरी (ता.पैठण) शिवारात रविवारी (ता.२३) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

आयशर टेम्पोने दिली दुचाकीला धडक, अपघातात एकजण ठार

sakal_logo
By
शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद) : चुकीच्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव-पांढरी (ता.पैठण) शिवारात रविवारी (ता.२३) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

रमेश बाबुराव कचरे (वय ३६ वर्षे, राहणार धनगाव, ता.पैठण) हे दुचाकीवरुन (एमएच २० एएक्स २४९६) कचनेर फाट्याकडुन पिंपळगावकडे चुकीच्या बाजूने येत होते. नेमके त्यावेळी आडुळकडुन औरंगाबादकडे जाणारा आयशर टेम्पोने (एमएच २५ एजे ५४११) समोरुन येणाऱ्या त्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार रमेश कचरे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. मात्र तोपर्यंत रमेश यांचा मृत्यू झाला होता. अपघातस्थळी पाचोड येथील पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, महामार्ग पोलिस बलभीम गोरे, भरत चव्हाण, नारायण भिसे, अशोक मुंढे यांनी वाहतूक सुरळीत केली. राम ढगे, रमेश गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

वाचा : मी जप केल्यामुळे कोरोनाकाळात भारतात अमेरिकेसारखी स्थिती नाही, खैरेंचा अजब दावा
 

रानडुकरांकडून पिकांची नाशधूस
खुलताबाद (जि.औरंगाबाद) :
यंदा खरीप पिकाची स्थिती चांगली नसून ऐन भरात असलेल्या या पिकांना संततधार पावसाने पिवळे पाडलेे आहे.यावर कहर म्हणजे शेतात उभ्या असलेल्या या पिकांची रानडुकरांकडुन होत असलेली नासधुस, तालुक्यातील डोंगराळ भाग हा या रानडुकरांसाठी पर्वणीच ठरला आहे.
तालुक्यातील म्हैसमाळ,लामणगांव,सुलीभंजन,नंद्राबाद,मावसाळा,खिर्डी,सालुखेडा या पट्ट्यात सध्या या रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. खाण्यापेक्षा पिकाची नासाडीच जास्त करीत आहे.

यात मका, भुईमुग या पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. दिवसा डोंगराळ भागात सुस्त पडुन असलेले रानडुकरांचे हे कळप मध्यरात्रीनंतर शेत शिवारात येतात अन पहाट होण्यापुर्वीच पिके आडवी करुन जातात. या रानडुकरांचा बंदोबस्त करण्याबरोबर पिकांची नुकसानभरपाई देण्याची मागणी तालुक्यातील मावसाळा येथील सोमीनाथ गोरे यांनी केली आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)

go to top