पवार साहेब निश्‍चित रुपाने एकनाथ खडसेंना योग्य ती जबाबदारी देतील - नवाब मलिक

टीम ई सकाळ
Saturday, 24 October 2020

एकनाथ खडसे हे पद पाहिजे म्हणून राष्ट्रवादीत आलेले नाहीत. ते महानेते आहेत. त्यांची योग्यता बघून पवार साहेब निश्‍चित रुपाने त्यांना योग्य ती जबाबदारी देतील, असे अल्पसंख्याक विकास, वक्फ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

औरंगाबाद : एकनाथ खडसे हे पद पाहिजे म्हणून राष्ट्रवादीत आलेले नाहीत. ते महानेते आहेत. त्यांची योग्यता बघून पवार साहेब निश्‍चित रुपाने त्यांना योग्य ती जबाबदारी देतील, असे अल्पसंख्याक विकास, वक्फ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

औरंगाबाद येथे शनिवारी (ता.२४) वक्फ बोर्ड कार्यालयात वक्फ कामकाजाचा आढावा बैठक पार पडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की एकनाथ खडसे यांना कुठले चॉकलेट देणार कॅडबरी की पार्ले-जी? या विचारलेल्या प्रश्‍नावर श्री मलिक म्हणाले, की पहिल्यांदा आम्ही मोदी साहेबांचा चहा कुठला हे तपासू . या महाराष्ट्रात लय चहाचे ब्रँड्स आहेत.

मास्क न वापरल्याबद्दल मोजले ३५ लाख, औरंगाबादेत साडेपाच महिन्यांत सात हजार जणांकडून दंड वसूल

कुठला चहा आणि कुठला ब्रँड हे ते ठरवतील. आम्ही चहा पण वाटत नाही. गोळ्याही वाटत नाही. चॉकलेटही वाटत नाही. पाच वर्ष त्यांचे सरकार होते. जे घोटाळ्याचे आरोप करत होते ते सर्व खोटे होते. आजच्या घडीला हे जलयुक्त शिवारातील चौकशी एसआयटीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय झाला आहे, असे श्री मलिक यांनी माहिती दिली.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse Not Joining For Profit In Nationalist Congress, Said Malik