अकरावीच्या ऑनलाईन तासिका सुरु, प्रवेशाची प्रतिक्षा कायम

संदीप लांडगे
Tuesday, 3 November 2020

आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर अकरावीचे ऑनलाइन प्रवेश १० सप्टेंबरपासून थांबलेले आहेत. प्रवेश सुरू करण्याबाबत अद्यापही शिक्षण विभाग पाऊले उचलत नाही, परंतु सोमवारपासून (ता.तीन) ऑनलाइन तासिका सुरू करण्यात केल्या आहेत.

औरंगाबाद : आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर अकरावीचे ऑनलाइन प्रवेश १० सप्टेंबरपासून थांबलेले आहेत. प्रवेश सुरू करण्याबाबत अद्यापही शिक्षण विभाग पाऊले उचलत नाही, परंतु सोमवारपासून (ता.तीन) ऑनलाइन तासिका सुरू करण्यात केल्या आहेत. शहरातील ठराविक महाविद्यालयातच या ऑनलाईन तासिका सुरु असून बहुतांश कॉलेजने मात्र, वेट ॲण्ड वॉच अशी भूमीका घेतली आहे. करोना प्रादुर्भावामुळे सर्व प्रक्रियेवर परिणाम झाला.

दहावी, बारावीचा निकाल दीड महिना उशिराने लागला. दहावीचा निकाल लांबल्याने त्याचा परिणाम अकरावी प्रवेशप्रक्रिया देखील उशिरा सुरू झाली. प्रक्रियेत दुसरी फेरी सुरू होण्यापूर्वी मराठा आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय आला. त्यानंतर नेमके काय, करायचे याबाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शनासाठी अकरावी ऑनलाइन प्रवेशासह राज्यातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रक्रिया थांबल्या. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला परंतु राज्य सरकारने याबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

मजुरांअभावी कापसाच्या वेचणीवर जातोय अर्धा खर्च! शेतकरी शाळकरी मुलामुलींसह शेतात

प्रक्रियेला विलंब लक्षात घेत राज्यात ऑनलाइन अकरावीच्या तासिका सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या. दोन नोव्हेंबरपासून अकरावी ऑनलाइन तासिका सुरू कराव्यात अशा सुचना देण्यात आल्या. त्यानुसार सोमवारपासून अनेक कॉलेजांनी अकरावीला प्रवेशित जेवढे विद़यार्थी आहेत त्यांच्रूा ऑनलाइन तासिका सुरू केल्या. औरंगाबाद शहरात ११६ कॉलेजांमध्ये ३१ हजारपेक्षा अधिक अकरावीची प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी २० हजारपेक्षा अधिक जागांवर विद़यार्थी प्रवेशित होतात. यंदा पहिल्या फेरीत केवळ सात हजार विद़यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश घेतले.

तेवढ़याच विद़यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली. यातील शहरातील काही कॉलेजांनीच ऑनलाइन तासिका सुरू केल्या. उर्वरित कॉलेजांमध्ये त्याचे नियोजन झाले नसल्याचे पहिल्याच दिवशी तासिका होऊ शकल्या नाहीत. .. इतर विद्यार्थ्यांचे काय? शैक्षणिक वर्षाचा विचार करत, शैक्षणिक वर्षावर परिणाम पडू नये यासाठी अकरावी प्रवेश रखडले असताना देखील ऑनलाईन वर्ग आजपासून सुरू करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक केले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय अद्यापही घेतलेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा यासाठी आता पर्याय म्हणून ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीचे प्रवेश निश्चित केले आहेत. त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. इतर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत संभ्रम मात्र कायम आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh Online Classes Starts, Still Wait For Admission