
औरंगाबाद शहरामधील कैसार कॉलनीतील पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडियाच्या कार्यालयावर गुरुवारी (ता.तीन) सक्तवसुली संचालनालयच्या पथकाने (ईडी) छापा टाकला आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद शहरामधील कैसार कॉलनीतील पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडियाच्या कार्यालयावर गुरुवारी (ता.तीन) सक्तवसुली संचालनालयच्या पथकाने (ईडी) छापा टाकला आहे. ईडीचे चार अधिकारी पॉप्युलर फ्रंटकडून आतापर्यंत खर्च करण्यात आलेल्या निधीची माहिती घेत असल्याची माहिती आहे. देशभरात औरंगाबादसह ईडीने गुरुवारी छापे टाकले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात झालेल्या हिंसक निदर्शनात पॉप्युलर फ्रंटचा हात असल्याचे पुढे आल्याने राज्य व केंद्रीय सुरक्षा संस्था दक्ष झाल्या आहेत. त्यातूनच हा छापा असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया काय आहे?
पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया ही कट्टरवादी संघटना आहे. झारखंड राज्यात या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या तक्रारीवरुन झारखंड सरकारने बंदीचा निर्णय घेतला आहे.
संपादन - गणेश पिटेकर