esakal | फेरमूल्यांकनात दहापेक्षा जास्त गुण मिळाल्यास शिक्षकांचे मानधन रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणपडताळणी आणि फेरतपासणीत दहापेक्षा अधिक गुण आढळून आले होते. त्यामुळे त्यांचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय

फेरमूल्यांकनात दहापेक्षा जास्त गुण मिळाल्यास शिक्षकांचे मानधन रद्द

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे मागील वर्षी घेतलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेत फेरमूल्यांकनासाठी औरंगाबाद विभागातून सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या फेरमूल्यांकनात अनेक विद्यार्थ्यांना दहापेक्षा जास्त वाढीव गुण मिळाले. त्यामुळे ज्या शिक्षकांनी या उत्तरपत्रिका तपासल्या होत्या, अशा सर्व शिक्षकांचे मानधन कपात करण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून देण्यात आला आहे. 

परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचे काही आक्षेप अथवा गुणांबाबत शंका असेल तर गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मागण्याची सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. यासाठी औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकन व पेपर तपासणीसाठी अर्ज केले होते.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

 या गुणपडताळणी प्रक्रियेत अनेक विद्यार्थ्यांना दहापेक्षा जास्त गुण वाढून मिळाले होते. त्यामुळे ज्या शिक्षकांनी या उत्तरपत्रिका तपासल्या होत्या, त्या शिक्षकांचे मानधन रद्द केले आहे; तसेच संबंधित संस्थेकडून त्या शिक्षकावर कार्यवाहीचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. दरवर्षी मंडळाकडे साधारणपणे अडीचशे ते तीनशेपर्यंतचे अर्ज सूंपर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मिळत होते; परंतु 2019 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेनंतर अडीच हजारांपेक्षा जास्त फेरमूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

एका गुणाने हुकते संधी 
दहावी आणि बारावीची परीक्षा ही आयुष्याला नवे वळण देणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत. त्यासाठी विद्यार्थी वर्षभर मेहनत करतात. त्यामुळे कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेताना आणि करिअरची वाट निवडताना प्रवेशपूर्व परीक्षेलाही विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी एका एका गुणाने मेरिटचे सीट जाण्याची शक्‍यता असते; तसेच आवडते कॉलेज न मिळण्याची भीतीदेखील असते. त्यामुळे जागरूक विद्यार्थी गुणपडताळणी करतात. मागील वर्षी घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणपडताळणी आणि फेरतपासणीत दहापेक्षा अधिक गुण आढळून आले होते. त्यामुळे त्यांचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे विभागीय सचिवांनी सांगितले.  
 

go to top