esakal | औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत कर्ज, आजारपणाचा उल्लेख
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Subhash Natkar

शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिरडपुरी (ता.पैठण) येथे रविवारी (ता. सहा) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सुभाष अंकुशराव नाटकर (वय ५२) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत कर्ज, आजारपणाचा उल्लेख

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिरडपुरी (ता.पैठण) येथे रविवारी (ता. सहा) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सुभाष अंकुशराव नाटकर (वय ५२) असे शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष नाटकर यांची हिरडपुरी शिवारात शेतजमीन असून सततच्या नापिकीमुळे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. गेल्या वर्षी त्यांनी बॅंकेकडून कर्ज काढून शेती केली; पण खर्चही वसूल झाला नाही. यंदा खासगी सावकाराकडून कर्ज काढून पेरणी उरकली.

अतिवृष्टीने हाती आलेले पीक वाया गेले. त्यातच त्यांना पाठीच्या आजार होता. उपचारासाठी सतत पैसे खर्च झाले. मणक्याची शस्त्रक्रिया करूनही त्रास वाढला. कर्जफेड कशी करावी, या विवंचनेत ते असत. आज सायंकाळी घरी त्यांनी विष घेतले. गावातील सचिन तांबे व इतरांनी त्यांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी सुभाष यांनी विष घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित जैन यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.पाचोड पोलिसांत घटनेची नोंद झाली.

खिशात सापडली चिठ्ठी
उत्तरणीय तपासणीदरम्यान पोलिसांना खिशातील चिठ्ठी सापडली. बँकेच्या दोन लाख रुपये कर्जापैकी पन्नास हजारांचा हप्ता भरला. पुढील पैसे भरू शकत नाही. त्यातच आजारपणाला कंटाळळलो, अशा आशयाचा मजकूर सुभाष नाटकर यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आहे.
 

Edited - Ganesh Pitekar