esakal | शिक्षणक्षेत्राच्या आधारवड काळाच्या पडद्याआड, फातेमा झकेरिया यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Fatima Zakaria News

फातेमा झकेरिया यांना वर्ष २००६ मध्ये शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

शिक्षणक्षेत्राच्या आधारवड काळाच्या पडद्याआड, फातेमा झकेरिया यांचे निधन

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : मौलाना आझाद एज्युकेशनल ट्रस्ट आणि मौलाना आझाद सोसायटीच्या अध्यक्षा फातेमा रफीक झकेरिया यांचे मंगळवार (ता.६) खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. फातेमा झकेरिया यांनी ५० वर्षांपेक्षा जास्त काळ पत्रकारिता, सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. फातेमा झकेरिया यांना वर्ष २००६ मध्ये शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  फातेमा झकेरिया यांचा जन्म मुंबईत येथे १७ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला. फातेमा झकेरिया यांनी इन्स्टीट्युट ऑफ सोशल वर्क, मुंबई येथुन शिक्षण घेतले. १९५८ मध्ये त्यांनी इन्स्टीट्युट ऑफ चिल्ड्रन ॲण्ड विमेन्स संस्थेद्वारे ५०० पेक्षा जास्त मुलांची देखलभाल त्यांच्या शिक्षण, आरोग्याची जबाबदारी घेतली. १९६३ मध्ये फातेमा झकेरिया यांनी 'द इलस्ट्रेटेड' या साप्ताहिकात लहान मुलांसाठी लेख सुरु केले.

डाॅक्टराकडे मेडिसिनची पदवी नाय! पण कोरोना रुग्णांवर उपचार सुरु, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुरात धक्कादायक प्रकार  

या मध्ये नियमित साप्ताहिक कॉलम चालविण्या व्यतिरिक्त त्यांनी डॉ. जाकिर हुसैन, कृष्ण चंदर अशा अनेक लेखांच्या लघुकथांचे उर्दुतून इंग्रजीत भाषांतर केले. १९७० ते १९८० या दरम्यान त्यांनी ‘दी विकली’ साप्ताहिकात उपसंपादक, मुख्य उपसंपादक तसेच सहायक संपादक म्हणून काम केले. यानंतर त्यांनी दी टाईम्स ऑफ इंडीया, दी विकलीमध्ये राजकीय, सांस्कृतिक विषयांवर लिखाण केले. त्यांनी इंदीरा गांधी, मार्गारेट थॅचर, जे. आर. डी., टाटा, जयप्रकाशन नारारायण, पंतप्रधान मोरारजी देसाई, चरण सिंग यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी १९८४ मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणुका, १९८४ मधील लंडन येथील फेस्टिव्हल ऑफ इंडीया कव्हर केले. केंद्र सरकारच्या मीडिया पुनर्रचनासाठी गठीत समितीच्या त्या सदस्य राहिल्या. या समितीचे अध्यक्ष जी. पार्थसारथी होते. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९८३ मध्ये पत्रकारितेसाठी सरोजीनी नायडु एकत्रीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

संपादन - गणेश पिटेकर