esakal | डाॅक्टराकडे मेडिसिनची पदवी नाय! पण कोरोना रुग्णांवर उपचार सुरु, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुरात धक्कादायक प्रकार  
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona News

कोरोना रुग्णांचे विलगीकरण न करता आपण त्यांच्यावर उपचार करीत असल्यामुळे आपल्या हाॅस्पिटलमधून कोरोना पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

डाॅक्टराकडे मेडिसिनची पदवी नाय! पण कोरोना रुग्णांवर उपचार सुरु, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुरात धक्कादायक प्रकार  

sakal_logo
By
भानुदास धामणे/दीपक बरकसे

वैजापूर (जि.औरंगाबाद) :  तहसीलदार, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह शहरातील लाडगाव रस्त्यावरील देवगिरी हाॅस्पिटलमध्ये जाऊन पाहणी केली असता हाॅस्पिटलमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. विशेष म्हणजे अग्रवाल यांच्याकडे एमडी मेडिसिनची पदवी नसतानाही त्यांनी दर्शनी भागात लावलेल्या फलकावर ही पदवी टाकली असल्याचा भांडाफोड पथकाने केला. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षकांनी गंभीर ठपका ठेऊन हाॅस्पिटलचे डॉ. गणेश अग्रवाल यांना नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तहसीलदार राहूल गायकवाड, प्रशिक्षणार्थी तहसीलदार निखिल धुळधर व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन टारपे यांच्या पथकाने  ता.३ एप्रिल रोजी शहरातील लाडगाव रस्त्यावरील डाॅ. अग्रवाल यांच्या देवगिरी हाॅस्पिटलमध्ये जाऊन भांडाफोड केला. डॉ. अग्रवाल यांच्याकडे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतीही परवानगी नसताना त्यांच्या हाॅस्पिटलमध्ये तब्बल सहा कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे या पथकास निदर्शनास आले.

'माझ्यावरील कारवाईसाठी मागणी करणारे शिवसेना-भाजपाचे नेते आता कुठे?

याशिवाय अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांनी डाॅ. अग्रवाल यांना नोटीस बजावली असून यात म्हटले आहे की, आपल्या हाॅस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच अनेक गोपनीय तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बाँबे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अंतर्गत मिळालेल्या परवानगीची प्रत आपण दर्शनी भागात लावलेली नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपल्याकडे कोणतीही परवानगी नसताना हाॅस्पिटलमध्ये सहा रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे निदर्शनास आले. या रुग्णांसाठी विलगीकरणाची कोणतीही व्यवस्था हाॅस्पिटलमध्ये करण्यात आली नव्हती. कोरोना रुग्णांच्या कक्षेत त्यांच्या नातलगांचा खुलेआमपणे वावर दिसून आला. हाॅस्पिटलमध्ये केवळ १० खाटांची परवानगी असताना या ठिकाणी जास्तीच्या खाटा ठेऊन रुग्ण ठेवल्याचे आढळून आले. आपल्याकडे फिजिशियन नसतानाही अतिदक्षता कक्ष सुरू असल्याचे दिसून आले.

Aurangabad DCC Bank: जिल्हा बँकेचे स्टेरिंग सत्तारांच्या हातात; मात्र सेनेत फूट

आपणाकडे एमडी पदवी नसतानाही अतिदक्षता चालवून आपण कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहात. रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवांचे दर दर्शनी भागात लावलेले नाहीत. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांसबधित कोणतीही लेखी माहिती आपल्याकडे नोंदविण्यात आलेली नाही. आपल्या म्हणण्यानुसार गेल्या महिन्यात चार रुग्ण दगावल्याचे म्हटले आहे. परंतु याबाबत आपण कोणताही पत्रव्यवहार संबंधित विभागाशी केलेला नाही. रुग्णाला दिलेल्या देयकाच्या पावत्या आपल्याकडे नाहीत. कोरोना रुग्णांवर उपचार करणारा स्वतंत्र कर्मचारी वर्ग, डाॅक्टर व पीपी किट आढळून आले नाही. आपणाकडे एमडी मेडिसिनची पदवी नसतानाही रुग्णालयाच्या फलकावर नावाखाली एमडी मेडिसिन पदवी दर्शवून जनतेची दिशाभूल केली आहे.

वैजापूर तालुक्यात गॅसचा स्फोट होऊन संसारोपयोगी साहित्य जळून खाक, महिला होरपळून जखमी 

कोरोना रुग्णांचे विलगीकरण न करता आपण त्यांच्यावर उपचार करीत असल्यामुळे आपल्या हाॅस्पिटलमधून कोरोना पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय कोरोना रुग्ण आपल्या हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती आपण स्थानिक प्रशासनाकडून लपवून ठेवली. त्यामुळे अशा रुग्णांची माहिती प्रशासनास मिळाली नाही. त्यामुळे असे बाधित रुग्ण सध्याही गावात फिरत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जबाबदारी आपणावर का निश्चित करण्यात येऊ नये. याबाबत आपले म्हणणे २४ तासांच्या आत सादर करावे अन्यथा आपणाविरुध्द कारवाई करण्यात येईल. असा इशारा डाॅ. गणेश अग्रवाल यांना या नोटीसीत देण्यात आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर