esakal | CoronaUpdate: औरंगाबादेत आज ५५ रूग्णांची भर, एक मृत्यू @१६४२
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus Image

औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण वाढत असून आज (ता.२) सकाळी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६४२ झाली आहे. मात्र १ हजार ४९ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ५१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

CoronaUpdate: औरंगाबादेत आज ५५ रूग्णांची भर, एक मृत्यू @१६४२

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आज (ता.२) सकाळी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६४२ झाली आहे. मात्र १ हजार ४९ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ५१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- वडिलाचा दफनविधी झाल्याच्या दिवशीच मुलगा पॉझिटिव्ह

७९ वा मृत्यू
औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचा १ जून रोजी रात्री  ११.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६३, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १५ व  जिल्हा रुग्णालयात ०१ बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ७९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

आज आढळलेले ५५ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)
शहा बाजार (१), किराडपुरा (२), चंपा चौक (१), कटकट गेट (१), नारळीबाग (१), गणेश कॉलनी (१), जवाहर नगर (३), भीम नगर (२), हमालवाडी (१),  शिवशंकर कॉलनी (२), नाथ नगर (२), ज्योती नगर (१), फजलपुरा परिसर (१),  मिल कॉर्नर (१), एन-३ सिडको (१), एमजीएम परिसर (१), रोशन गेट (१)

विशाल नगर, गारखेडा परिसर (१), एन-सहा संभाजी कॉलनी (७), समता नगर (५), अंहिसा नगर (१), मुकुंदवाडी (१), विद्या निकेतन कॉलनी (१), न्याय नगर (१),  बायजीपुरा (२), संजय नगर, मुकुंदवाडी (४), विजय नगर (२), यशवंत नगर, पैठण (१), चंपा चौक, म्हाडा कॉलनी (१), नेहरु नगर (१), जुना मोंढा नाका परिसर (१), अन्य (३) या भागातील कोरानाबाधित आहेत. यात २४ महिला आणि ३१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

असा आहे कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण - १०५९
एकूण मृत्यू - ७९
उपचार सुरु असलेले रुग्ण - ५१४
एकूण रुग्णसंख्या - १६४२

क्लिक करा: सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

go to top