मास्कविना फिरणाऱ्यांकडून चोपन्न लाखाच दंड वसुल

मधुकर कांबळे
Monday, 21 December 2020

कोरोनाचे संकट अजुन पूर्णपणे टळले नाही तरीही अनेकजण मास्क न वापरता फिरत आहेत. यामुळे प्रशासनाने मास्क न वापरता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

औरंगाबाद : कोरोनाचे संकट अजुन पूर्णपणे टळले नाही तरीही अनेकजण मास्क न वापरता फिरत आहेत. यामुळे प्रशासनाने मास्क न वापरता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत महापालिकेने अशा तब्बल १० हजार ९०३ जणांना दंड ठोकला आहे. या सर्वांकडून तब्बल ५४ लाख रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. शहरात मार्चमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाला. एप्रिलपासून कोरोनाचे संक्रमण अधिक वाढले. यामुळे सर्वांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न घालणाऱ्यांना महापालिका प्रत्येकी ५०० रुपये इतका दंड आकारत आहे.

 

 

१ मे पासून महापालिकेने ही कारवाई तीव्र केली. शहरात रोज ५० ते १०० लोकांना दंड केला जात आहे. तरीही अनेकजण बेफिकीरपणे वागत आहेत. अजूनही काही भागात मास्क न घालताच लोक घराबाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिका पथकांकडून होणाऱ्या दंडात्मक कारवायाही वाढल्या आहेत. १ मेपासून १९ डिसेंबर पर्यंत साडे सात महिन्यात महापालिकेच्या पथकाने तब्बल १० हजार ९०३ लोकांना मास्क न घातल्याने दंड ठोकला आहे. त्यांच्या प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे ५४ लाख ५१ हजार पाचशे रुपये इतका दंड वसूल झाला आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty Four Lakh Collected As Fined From Unwearing Mask People