संचारबंदीत भोजनाचे मोफत पाकीट 

अनिल जमधडे
गुरुवार, 26 मार्च 2020

सु-लक्ष्मी संस्थेचा गोरगरिबांसाठी उपक्रम 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात निराश्रित, बेघर आणि रुग्णांच्या नातेवाइकांची उपासमार होऊ नये सु-लक्ष्मी संस्थेतर्फे मोफत जेवणाच्या पाकिटांसह विविध वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जेवणाचे मोफत वाटप 

धर्मादाय सहआयुक्त सुरेंद्र बियाणी यांच्या आवाहनानुसार संस्थेतर्फे शहरातील शासकीय रुग्णालयाबाहेरील नातेवाईक तसेच शहरातील विविध ठिकाणी जावून गरजवंतांना रोज जेवणाच्या पाकिटांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गरीब, निराश्रित, बेघरांना गरजेनुसार कपडे, अन्नदान, फळे, मास्क, झेंडू बाम, पाणी वाटप करण्यास येत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अशी आहे टीम

शहतील ज्या ठिकाणी निराश्रित आहे, त्यांचा शोध घेऊन अन्नदान करण्यात येत आहे. या उपक्रमात ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर, अनिल लुनिया, सुमित पंडित, लक्ष्मण बोर्डे, कल्पेश पंडित, देविदास पंडित, पुजा पंडित, लक्ष्मी पंडित व माणुसकी ग्रुपच्या सदस्यांनी आर्थिक मदत जमा करून उपक्रम राबवत आहे. यावेळी अरविंद घुले, सोमनाथ मालकर, बाबुराव वाघ, सतीष पाटील, इसराईल मेवाती, रामेश्वर नागरे यांनी प्रयत्न केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food Donation News Aurangabad