शेतकऱ्यांसाठी अन्न प्रक्रिया उद्योग अत्यावश्‍यक

file photo
file photo

औरंगाबाद : "वाढते शहरीकरण, वेळ नसणे, आरोग्याबाबत जागृती, कमीत कमी श्रमात उत्कृष्ट वस्तूंच्या मागणीमुळे कृषी उत्पादनाच्या वस्तूंना बाजारपेठ वाढती आहे. शेतीमालाला चांगला भाव आणि प्रक्रियेनंतर त्याच्या किमतीत वृद्धी लक्षात घेता अन्नप्रक्रिया उद्योग हा आज सर्वांत चांगला व्यवसाय ठरतो आहे. ग्राहकांना फळे, भाजीपाला आणि इतर उत्पादने घरपोच देऊन चांगली किंमत प्राप्त करतानाच शेतीमालाला चांगला भाव देऊन आपण शेतकऱ्यांना त्यांचा स्वाभिमानी परत मिळवून देऊ शकतो, असे मत विविध वक्‍त्यांनी व्यक्त केले. 


ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पोमध्ये शनिवारी (ता.11) फूड प्रोसेसिंग कॉन्फरन्समध्ये विविध वक्‍त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. "कृषी व्यवसायातील नवीन वाटा' या विषयावर शिवनाथ बोरसे यांनी माहिती दिली. यशस्वी महिला उद्योजक, कुटे उद्योगसमूहाच्या अर्चना कुटे आणि नाशिकच्या अन्नप्रक्रियेतील यशस्वी उद्योजक मनीषा धात्रक यांनी त्यांच्या यशस्वितेचे रहस्य उलगडून सांगतानाच असा उद्योग सुरू करताना घ्यायची काळजी, त्यासाठीचे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, बाजारपेठ, अर्थ व्यवस्थापन आदी विविध बाबींची माहिती दिली. उत्कृष्ट दर्जाला पर्याय नसल्याने त्याबाबत कधीही तडजोड न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. 

उत्पादन लक्षात घेऊन प्रक्रिया उद्योग सुरू केले

याप्रसंगी शिवनाथ बोरसे यांनी शेती व्यवसायातील पाण्याचे महत्त्व विशद केले. रासायनिक खतांच्या वापराने उत्पादन, शेतजमीन, पाणी आणि अशी उत्पादने सेवन करणारांचे आरोग्य अशा सर्वच अंगांनी होणाऱ्या दुष्परिणामांची सविस्तर माहिती दिली. कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग एकाच ठिकाणी उभारण्यास विरोध करून त्यांनी ग्रामीण भागात, तेथील उत्पादन लक्षात घेऊन प्रक्रिया उद्योग तेथेच सुरू केले तर तेथेच रोजगार निर्माण होतील, कृषिमालाला जवळ बाजारपेठ मिळेल आणि शहराकडील स्थलांतर थांबून स्मार्ट गाव तयार होतील, असे त्यांनी सांगितले.

सेंद्रिय कृषी उत्पादनासाठी मंडई सुरू

शहरातील प्रत्येक वसाहतीत सेंद्रिय कृषी उत्पादनासाठी मंडई सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात इंडियन फूड प्रोसिसिंग इंडस्ट्री - प्रेसेंट ऍण्ड फ्युचर ऑपर्च्युनिटिज' या विषयावर डॉ. प्रबोध हळदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहकाला काय हवे आणि गृहिणींचा वेळ व कष्ट कसे वाचतील याचा विचार करून आपले उत्पादन ठरवा. विना बाजारपेठ कोणतेही उत्पादन घेऊ नका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com