पक्ष्यांच्या संवर्धनासाठी हे चौघे करताहेत सायकलवर यात्रा (वाचा सविस्तर)

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

पक्ष्यांचा अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्ष्यांसाठी सायकलने भ्रमंती करावी, हा संदेश घेऊन वर्ध्याहून चार पक्षीमित्र सायकलस्वार वर्धा ते रेवदंडा सायकलवारी करत आहेत. वर्ध्याहून निघालेली ही सायकलवारी कारंजा- मेहकर- लोणार- जालना- औरंगाबाद- अहमदनगर- तळेगाव-अलिबागमार्गे रेवदंडा येथे जाणार असुन ते सुमारे 800 किमी अंतर पार करणार आहे. यात्रेचे औरंगाबादेतील निसर्ग मित्रमंडळातर्फे स्वागत करण्यात आले.

औरंगाबाद : पक्ष्यांचा अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्ष्यांसाठी सायकलने भ्रमंती करावी, हा संदेश घेऊन वर्ध्याहून चार पक्षीमित्र सायकलस्वार वर्धा ते रेवदंडा सायकलवारी करत आहेत. वर्ध्याहून निघालेली ही सायकलवारी कारंजा- मेहकर- लोणार- जालना- औरंगाबाद- अहमदनगर- तळेगाव-अलिबागमार्गे रेवदंडा येथे जाणार असुन ते सुमारे 800 किमी अंतर पार करणार आहे. यात्रेचे औरंगाबादेतील निसर्ग मित्रमंडळातर्फे स्वागत करण्यात आले. 

हेही वाचा - वहिनी मला तू खूप आवडते म्हणत त्याने कवटाळले मित्राच्या पत्नीला : (वाचा कुठलं...

कोकणातील रेवदंडा येथे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व अमेझिंग नेचर क्‍लब यांच्यावतीने 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन 11 व 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. या संमेलनासाठी औरंगाबादहून निसर्ग मित्र मंडळाचे काही सदस्य या संमेलनात सहभागी होणार आहेत राज्याच्या सर्वच भागातून पक्षी प्रेमी या संमेलनात सहभागी होणार आहेत. वर्ध्याहून बहार फाऊंडेशनच्या पक्षीमित्रांनी पर्यावरणाशी केलेली मैत्री जोपासत संमेलनात सहभागी होण्यासाठी सायकल सफरीची निवड केली. यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सदस्य दर्शन दुधाने आणि दीपक गुढेकर असे चौघेजण उपक्रमात सहभागी झाले आहेत.

हे वाचलंत का? -युवकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र : का बरं ते वाचा 

हे चौघे पक्षी अभ्यासक शनिवारी (ता.4) वर्ध्याहून सायकल वारी करत आहेत. मंगळवारी (ता.7) सकाळी या सायकलवारीने औरंगाबादहुन निघून नगरकडे प्रस्थान केले. या वेळी महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे व निसर्ग मित्रमंडळाचे सचिव किशोर गठडी व सहकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. यावेळी पी. आर. पानसे, नागेश देशपांडे, प्रा. श्रीराम जाधव, सुनील बोरा, कविता गठडी, महेंद्र देशमुख आदिंची उपस्थिती होती.

क्लिक करा-...म्हणून विशेष मागासवर्ग विभागाच्या सहसचिवांना उच्च न्यायालयाने बजावलीय नोटीस...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four bird lover young boys awaring for bird conservation through bicycle