धोका वाढला! औरंगाबादमध्ये अजून चार नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

रुग्णांची शंभरी पार, १०९ पॉझिटिव्ह 

औरंगाबाद : ‘कोरोनाकंपा’ने औरंगाबाद शहर सोमवारी हादरल्यानंतर मंगळवारही तसाच उगवला. सकाळच्या सत्रात तेरा, दुपारी दहा, तर रात्री चार असे दिवसभरात २७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. आता बाधितांचा आकडा १०९ वर गेला. घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. 

शहरात काल दिवसभरात २९ नवे रुग्ण आढळले होते. आज सकाळी १३ जण पॉझिटिव्ह आले. यात सोळा वर्षांखालील सहा मुले आहेत. बाधितांपैकी बारा किलेअर्क येथील असून, एक भावसिंगपुरा येथील आहे; तसेच सात ४४ वर्षांआतील रुग्ण आहेत. यात तीन पुरुष व चार महिला आहेत. दुपारी दहा अहवाल पॉझिटिव्ह आले. या कोरोनाबाधितांत संजयनगर, मुकुंदवाडी येथील २, किलेअर्क येथील १, पैठणगेट येथील ४, भीमनगर येथील १, बडा तकिया मस्जिद सिल्लेखाना येथील १ आणि दौलताबाद येथील १ अशा नव्या दहा रुग्णांचा समावेश आहे.

या दहा रुग्णांत आठ पुरुष, दोन महिला आहेत. पंधराच्या आतील १, पंधरा ते साठमध्ये ५, पन्नासच्या वर ४ रुग्ण असल्याची माहिती डॉ. येळीकर यांनी दिली. रात्री साडेदहाच्या सुमारास चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आला यात चेलीपुरा, पैठणगेट, आसेफिया कॉलनी येथील प्रत्येकी एक तर राज्य राखीव पोलिस दलाच्या एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

दोन दिवसांत ५६ रुग्ण 
  

 • नूर कॉलनी ः १२ 
 • काळा दरवाजा ः ०१ 
 • किलेअर्क ः २६ 
 • आसेफिया कॉलनी ः ०३ 
 • भावसिंगपुरा ः ०३ 
 • दौलताबाद ः ०१ 
 • पैठणगेट ः ०५ 
 • सिल्लेखाना ः ०१ 
 • संजयनगर मुकुंदवाडी ः ०२ 
 • चेलीपुरा ०१ 
 • एसआरपीएफ जवान... ०१ 
 • एकूण ः ५६ 

महाराष्ट्र दिनाबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

 
कोरोना मीटर  (कंसात टक्केवारी) 

 • उपचार घेत असलेले रुग्ण ः ७९ (७२.४७) 
 • बरे झालेले रुग्ण ः २३ (२१.१०) 
 • मृत्यू झालेले रुग्ण ः ०७ (६.४२) 
 • एकूण ः १०९ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four new patients of Corona in Aurangabad