Coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा चौथा बळी, बाधितांची संख्याही वाढली

Wednesday, 22 April 2020

या महिलेला १९ एप्रिलला रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घाटीमध्ये भरती करण्यात आले होते. त्या चार दिवसांपासून ताप व दमा या आजाराने त्रस्त होत्या. बेशुद्धावस्थेत त्यांना अपघात विभागात दाखल करण्यात आले होते.

औरंगाबाद : येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या भीमनगर भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मंगळवारी (ता. २१) सकाळी सव्वासातच्या सुमारास मृत्यू झाला.  दरम्यान, त्यांच्या स्बॉवचे नमुने घेण्यात आले होते. त्यात रात्री आठ वाजता त्यांचा कोवीड -१९ अहवाल रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी  पॉझिटिव्ह आला. औरंगाबादेतील हा कोरोनाचा चौथा बळी आहे, अशी माहिती घाटीच्या मेडिसिन विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.

या महिलेला १९ एप्रिलला रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घाटीमध्ये भरती करण्यात आले होते. त्या चार दिवसांपासून ताप व दमा या आजाराने त्रस्त होत्या. बेशुद्धावस्थेत त्यांना अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण फक्त ५० टक्के झाले असल्याने त्यांना अपघात विभागातच कृत्रिम श्वासोच्छास देत कोरोनाचा संशयित म्हणून कोवीड इमारतीतील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्याने २१ एप्रिलला त्यांचा सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी मृत्यू झाला. 

होता उच्च रक्तदाब

या महिलेला बऱ्याच वर्षांपासून उच्च रक्तदाबाची समस्यांची होती. १९ एप्रिलला त्यांच्या लाळेचे नमुनेही  घेण्यात आले होते. मात्र, त्यावेळी रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण, दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचा २१ एप्रिलला सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी मृत्यू झाला. मात्र कोरोना संशयित रुग्ण असल्याने त्यांचा मृत्यूनंतर स्वॅब घेण्यात आला होता. २१ एप्रिलला रात्री आठ वाजता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना बायलॅटरल न्यूमोनाईटीस विथ हायपरटेन्शन व आयक्यूट रेस्पेरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम हा आजारही होता. 

हेही वाचा - कोरोना बरा होतो; मग एड्सपेक्षा धोकादायक का? 

‘त्या’ चालकाला पोलिसांनी पकडले
शहरात गेल्या आठवड्यामध्ये मुंबईहून आलेल्या गर्भवती महिलेसह तिच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, हे कुटुंब औरंगाबाद येथे रुग्णवाहिकेने आले होते. मात्र, रुग्ण वाहिकेच्या चालकाने पळ काढला होता. मंगळवारी पोलिसांनी या रुग्णवाहिकेच्या चालकाला पकडले असून, त्याची कोवीड-१९ ची चाचणी केली जाणार आहे.
 
दिवसभरात चार बाधित 
औरंगाबाद शहरात मंगळवारी ‘कोवीड- १९’ चा संसर्ग झालेल्या चार नवीन कोरोना रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३६ झाली. त्यापैकी ही ज्येष्ठ महिला धरून एकूण चौघांचा मृत्यू झाला. सध्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.१५ रुग्ण बरे झाले आहेत. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fourth death from corona in Aurangabad