Crime News: गवळीशिवरा येथे भरदिवसा दरोडा; 8 ते 10 लाखांची चोरी

दिगंबर केरे
Sunday, 17 January 2021

कुटूंबातील सर्व सदस्य शेतात काम करण्यासाठी गेलेले असताना ही चोरी झाली आहे

गवळीशिवरा (औरंगाबाद): येथील रावसाहेब काळवणे या शेतकऱ्याच्या घरी चोरी झाली आहे. घरामध्ये दुपारी घरी कुणी नसल्याचा फायदा घेत आज्ञात दरोडेखोराकडून काही रोख रकमेसह सोन्या चांदीच्या वस्तुसह अंदाजीत 8 ते 10 लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पसार केल्याची घटना घडली आहे.

चोरी झालेले कुंटूब हे शेतकरी कुटूंब आहे. कुटूंबातील सर्व सदस्य हे शेतात काम करण्यासाठी गेलेले होते व रावसाहेब काळवणे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या सुमारास ही घटना घडली होती.

सिल्लोड तालुक्यातील पळशीत दोन गटांत तुंबळ हाणामारी, ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून भांडण | eSakal

कळवणे दुपारी घरी परतले व दरवाजा उघाडताच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. ही घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शेजारील नागरिकांना बोलवून चोरी झाल्याचे सांगितले. एकच आरडाओरड चालु झाली रावसाहेब काळवणे यांनी या घटनेची माहिती शिल्लेगाव पोलिस स्टेशनला देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gavalishivara theft news aurangabad crime news