
औरंगाबाद : जमावबंदी व संचारबंदी लागू असतानाही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी ऊठबशा काढायला लावल्या. हा प्रकार शुक्रवारी (ता. २४) दुपारी शहागंज परिसरातील चेलीपुरा चौकात घडला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात जमावबंदी व संचारबंदी आहे. असे असतानाही सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंतच्या काळात अनेक नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे रोज आढळून येत आहे.
हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान
पोलिसांनी वारंवार आवाहन करूनसुद्धा नागरिक ऐकत नसल्याने, शुक्रवारी पोलिसांनी चेलीपुरा चौकात विनाकारण फिरणाऱ्या आठ ते दहाजणांना अडविले. अडविलेल्यांची चौकशी केली असता सर्वच जण उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी व राज्य राखीव दलाच्या जवानांनी सर्वांनाच ऊठबशा काढायला लावल्या. त्यानंतर परत रस्त्यावर फिरणार नाही, अशी हमीही पोलिसांनी यावेळी त्यांच्याकडून घेतली.
हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..
नशेच्या गोळ्या विकणाऱ्यास अटक
नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यास सिटी चौक पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने गजाआड केले. ही कारवाई गुरुवारी (ता. २४) दुपारी शहागंज परिसरातील चेलीपुरा येथे करण्यात आली. शेख अतीक शेख अब्दुल्ला (वय ४२, रा. खत्री दवाखान्याजवळ, चेलीपुरा) असे नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा : बोंबाबोंब झाल्यानंतर आली प्रशासनाला जाग
चेलीपुरा भागात एकजण नशेच्या गोळ्या विक्री करीत असल्याची माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली होती. सिटी चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक राजगोपाल बजाज आदींच्या पथकाने चेलीपुरा चौकात सापळा रचून शेख अतीक याला ताब्यात घेतले. पोलिसांनी शेख अतीक याची झडती घेतली असता, त्याच्याजवळून ४ हजार ७७० रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्यांच्या ८० स्ट्रीप्स मिळून आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.