एक खिडकी सुविधेतून मिळणार पदवीधरसाठी विविध परवानग्या, औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

मधुकर कांबळे
Tuesday, 10 November 2020

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या दृष्टीने पोलिस, महसूल अधिकारी आदी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या दृष्टीने पोलिस, महसूल अधिकारी आदी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर राजकीय पक्ष, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी यांना आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी सुविधेतून देण्यात येणार असल्याने सर्वांनी निवडणूक अनुषंगाने आवश्यक कार्यवाही तत्पर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कायदा व सुव्यवस्था व आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबत मंगळवारी (ता.दहा) श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

पंकजा मुंडे नाराज नाहीत, मी हात जोडून सांगतो! चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना केली विनंती

यावेळी  पोलिस आयुक्त निखील गुप्ता, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी आदींची उपस्थिती होती. तात्पुरते प्रचार कार्यालय, वाहन परवाना, होर्डिंग, बॅनर, झेंडे, पोस्टर, ध्वनीक्षेपक, मिरवणूक, रॅली, रोड शो, जाहीर सभा, राजकीय पक्षांच्या बैठका, चौक सभा आदींच्या परवानग्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुविधेतून कार्यालयीन वेळेत मिळणार असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या प्रकरणांची तात्काळ दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, राजकीय पक्ष आणि प्रशासकीय यंत्रणेत योग्य समन्‍वय राखून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, पोलिस व संबंधित विभागांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून आवश्यक असणारी कार्यवाही तत्काळ करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अपर जिल्हाधिकारी श्री.गव्हाने यांनी पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती व करावयाची कार्यवाही याबाबत माहिती दिली. पोलिस आयुक्त श्री.गुप्ता यांनीही पोलिस विभागाला आवश्यकत्या सूचना केल्या.

केळीच्या बागेत झेंडू फुलाचे आंतरपिक घेऊन शेतकऱ्याने साधली समृद्धी! विजयादशमीला मिळाले एक लाखाचे उत्पन्न

राजकीय पक्षांशीही साधला संवाद

जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी राजकीय पक्षातील प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना व सुविधांबाबत उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधला. या बैठकीस डॉ.कल्याण काळे, डॉ. भाऊसाहेब जगताप, राजेश मेहता, नितीन बागवे, विजय औताडे आदींची उपस्थिती होती.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get Various Permissions Through One Window, Aurangabad Collector Give Information