संतापजनक : आई-वडील बाहेर जाताच गतिमंद तिच्याशी त्याने केले असे...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 February 2020

पोलिस ठाण्यात नोंद तक्रारीनुसार, एकनाथ भिवसेन नरवडे (६५, रा. कागजीपुरा, मिलकॉर्नर परिसर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तो वॉचमन म्हणून कामाला आहे.

औरंगाबाद - वडिलांच्या ओळखीतील एका ६५ वर्षीय वृद्धाने ३७ वर्षीय गतिमंद तरुणीवर अत्याचार केला. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, पीडितेला वेदना असह्य झाल्यावर तिने पालकांना ही माहिती दिली. या प्रकरणी शुक्रवारी (ता. २१) क्रांती चौक पोलिसांनी संशयिताला अटक केली. 

पोलिस ठाण्यात नोंद तक्रारीनुसार, एकनाथ भिवसेन नरवडे (६५, रा. कागजीपुरा, मिलकॉर्नर परिसर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तो वॉचमन म्हणून कामाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय पीडिता गतिमंद आहे. नरवडे हा तिच्या वडिलांच्या ओळखीचा आहे. त्यामुळे तो मागील पंधरा- सोळा वर्षांपासून पीडितेच्या भाग्यनगरातील घरी यायचा १४ फेब्रुवारीला पीडितेची आई लग्नाच्या कार्यक्रमासाठी तर वडिलही बाहेर गेले गेलेले असल्याने पीडिता एकटीच घरी होती. दुपारी दीडच्या सुमारास नरवडे पीडितेच्या घरी आला. तेव्हा पीडिता जेवण करीत होती. संशयिताने तिला जेवणाच्या ताटावरून उठवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तेथून निघून गेला. त्यानंतरही तो अधून-मधून पीडितेला एमआयडीसीच्या कार्यालयात घेऊन जायचा. तेथेही त्याने अनेकदा अत्याचार केला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अनिता बागूल करीत आहेत. 

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

रेल्वेखाली आल्याने तरुण ठार 

औरंगाबाद - गारखेडा परिसरातील तरुण रेल्वेखाली आल्याने ठार झाला. त्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे. ही घटना गुरुवारी (ता. २०) रात्री साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार श्याम सुखदेव भालेराव (वय १९, रा. आनंदनगर) असे मृताचे नाव आहे. श्याम एका खासगी कंपनीत कामाला होता. गुरुवारी रात्री नऊ वाजता भावासोबत गप्पा मारल्यानंतर तो घराबाहेर पडला. त्याचा छिन्नविच्छिन्न मृतदेह शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक ५५ जवळ आढळून आला. शुक्रवारी सकाळी पुंडलिकनगर पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला. तपास जमादार बिऱ्हाडे करीत आहेत. 

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

दीड लाखासह दागिने लंपास 
 

औरंगाबाद - हर्सूल भागातील एका प्राध्यापकाचे घर फोडून चोरांनी दीड लाख रोख व तीस हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना गुरुवारी (ता. २०) उघडकीस आली. 
याबाबत नीलेश पंढरीनाथ फलक (रा. साईनगर, हर्सूल परिसर) यांनी तक्रार दिली. ते एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असून, त्यांच्या मुलाचा कर्णछेदनाचा १० मार्चला कार्यक्रम होता. त्यासाठी त्यांनी १५ फेब्रुवारीला बँकेतून दीड लाख रुपये काढून घरी ठेवले होते. कार्यक्रमाची पत्रिका वाटण्यासाठी ते परिवारासह बाहेरगावी गेले. गुरुवारी परत घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांना दिसले. चोरांनी कपाटातील दीड लाख रुपये आणि ३० हजारांचे सोने लंपास केले. यानंतर त्यांनी हर्सूल ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग भागिले करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Raped At Aurangabad