
औरंगाबाद महापालिकेतर्फे कचऱ्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ अहवाल दोन महिन्यात सादर करा असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीला दिले आहेत.
औरंगाबाद : महापालिकेतर्फे कचऱ्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ अहवाल दोन महिन्यात सादर करा असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीला दिले आहेत.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाबाबत शहरातील सुरज अजमेरा यांनी राष्ट्रीय हरित लवादकडे दाद मागितली होती. शहरात घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली आहे.
या ठिकाणी प्रक्रिया न केलेला घनकचरा शास्त्रोक्त पद्धतीने साचवला जात नाही, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे अजमेरा यांनी अर्जात नमूद केले आहे. त्याची दखल घेत हरित लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीला वस्तुनिष्ठ अहवालासह अॅक्शन टेकन रिपोर्ट दोन महिन्यात सादर करण्याचे न्या. आदर्श कुमार गोयल, एस. के. सिंग, तज्ज्ञ सदस्य डॉ. नंदा दिले आहेत.
Edited - Ganesh Pitekar