esakal | Gold Silver Prices: सोनं पन्नास हजारांच्या आत; पण चांदीने खाल्ला 'भाव'
sakal

बोलून बातमी शोधा

gold rate

मागील काही दिवसांपासून चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत तर दुसऱ्याबाजूला सोने उतरताना दिसत आहे

Gold Silver Prices: सोनं पन्नास हजारांच्या आत; पण चांदीने खाल्ला 'भाव'

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : लॉकडाऊन काळात ६० हजारांच्या घरात पोहोचलेले सोन्याचे दर आता प्रति १० ग्रॅमला ५० हजारांच्या आता आले आहेत. दुसरीकडे चांदी भाव खाऊ लागली असून चांदीचे दर प्रतिकिलो ७० हजार रुपयांवर पोहोचले आहेत. औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वापर वाढल्यामुळे चांदीच्या दरात वाढ झाल्याचे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलीक यांनी सांगितले. सोन्याच्या किंमती काही प्रमाणात घट होणार असून चांदीचे दर स्थिर राहणार असल्याची माहिती सराफा संदीप मैड यांनी 'सकाळ'ला सांगितले.

भारतात सोने-चांदी खरेदी शुभ मानले जाते. त्यानुसार सण-उत्सवात सोन्यांची खरेदी केली जाते. लॉकडाऊन काळात सर्वकाही ठप्प असताना सोन्यांच्या किंमतीने मोठी उसळी घेतली होती. त्यावेळी सोन्यांच्या किंमती प्रति १० ग्रॅम ६० हजारांच्या जवळपास गेल्या होत्या. तर चांदी प्रतिकिलो सोन्यांच्या किंमतीपेक्षा ५०० ते हजार रुपयांनी कमी होते. आता सोने ४८ हजार १०० रुपये प्रतितोळे तर चांदी हे ७० हजार रुपये किलोने विक्री होत आहे.

दोन मित्रांची 2021 ची शिवजयंती ठरली अखेरची! घरी परतत असताना अपघातात दोघांचा...

औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांतर्फे चांदीचा वापर वाढला असल्यामुळे चांदीची मागणी वाढली आहेत. त्यामुळे दर कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. इलेक्टॉनिक्स साहित्य तसेच चारचाकी वाहनातही चांदीचा वापर करण्यात येऊ लागल्यामुळे चांदीला पूर्वीपासून मागणी आहेत. सोने-चांदीच्या बरोबर तेवढ्याच प्रमाणात चांदी खरेदी केली जात आहेत. लग्नसोहळ्यात सोन्यावरील आयात कर कमी केल्यामुळे पुढील काही काळात सोन्यांची खरेदीत वाढ होणार आहेत. यामुळे सोन्यांच्या दरात चढ-उतार सुरुच राहणार असल्याचेही राजेंद्र मंडलीक म्हणाले.

"औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वापर वाढल्यामुळे चांदीचे दर वाढत चालले आहेत. पुढील काळात चांदीचे दर स्थिर राहणार आहेत. सोन्याच्या किंमतीत कमी जास्त प्रमाणात बदल दिसेल."
संदीप मैड,सराफा व्यवसायिक.