सरकारची मान्यता, पण चित्रपटगृहे बंदच; डिजिटल प्रेक्षपणात अडचणी

मनोज साखरे
Thursday, 5 November 2020

कोरोनाचा मोठा फटका चित्रपट, नाट्य व्यावसायिकांना बसला. चित्रपटगृह चालकांचेही अतोनात हाल झाले.

औरंगाबाद : कोरोना काळापासून लॉकडाऊनचा सामना सर्वच क्षेत्रांना करावा लागला. अनलॉकच्या अखेरच्या टप्प्यात शासनाने अचानक चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. परंतू अचानक तारखेची निश्‍चिती सरकारकडून आल्याने ऐनवेळीची तयारी, तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यास वेळ लागत असल्याने तसेच डिजिटल प्रेक्षपणाला अडचणी आल्यामुळे चित्रपटगृहे गुरूवारी (ता.पाच) सुरु होऊ शकली नाहीत. कोरोनाचा मोठा फटका चित्रपट, नाट्य व्यावसायिकांना बसला. चित्रपटगृह चालकांचेही अतोनात हाल झाले.

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या विरोधातील तक्रार आमदार पवारांनी घेतली मागे

चित्रपट व नाट्यगृहे सुरु करण्याची मागणीही झाली. अनलॉक सुरु झाल्यानंतर हळूहळू सर्व व्यवसाय खुले झाले. परंतू चित्रपटगृहे सुरु करण्यास सहजपणे हिरवा कंदील मिळाला नाही. चित्रपट, नाट्यगृह चालकांची तशी मागणीही होती. सरकारने याकडे सकारात्मक दृष्टीने विचार करण्याबाबत आश्‍वासनही संघटनेला दिले. त्यानंतर सरकारने तारीख जाहीर केली. पण कमी कालावधीत चित्रपटगृहांचे पूर्ण निर्जंतुकीकरण, तांत्रिक बाबींची पूर्तता व शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणीसाठी ही वेळ लागणार होता. त्यामुळे बुधवारी (ता.पाच) झालेल्या निर्णयानंतर लगेच आज चित्रपटगृहे सुरु होऊ शकली नाहीत. शहरातील सर्व मल्टिप्लेक्सही सुरु झाले नसल्याचे गुरुवारी चित्र होते.

मुंबईत डिजिटल प्रेक्षपण
चित्रपटगृहे कधी उघडणार याची ठोस माहितीही या क्षेत्रातील मंडळींकडे होतीच असे नाही. याबाबतची तारीख आधीच निश्‍चित न झाल्याने यंदाच्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यताही नव्हती. या सर्व बाबींसोबतच मुंबईत डिजीटल प्रेक्षपण बंदच होते ही तांत्रिक अडचणही चित्रपटगृहे सुरु न होण्यामागे होती असे सुत्रांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Permission But Theater Not Open Aurangabad News