
सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू धर्मियाच्या भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी सोनी टीव्ही व अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी तक्रार आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली होती.
लातूर : सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू धर्मियाच्या भावना दुखावल्या गेल्याप्रकरणी सोनी टीव्ही व अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी तक्रार आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली होती. पण या तक्रारीनंतर मुख्य हेतू दुर्लक्षित होऊन इतर मुद्द्यांवर काही जण राजकारण करून सामाजित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ही तक्रार मागे घेण्यात आल्याची माहिती श्री.पवार यांनी दिली.
शाळांना दिवाळीच्या पाचच दिवस सुट्या, ऑनलाइन अध्यापन राहणार बंद
सोनी टीव्हीवर ता.३० आॅक्टोबर रोजी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात विचारल्या गेलेल्या वादग्रस्त प्रश्नाबाबत आपण तक्रार केली होती. ही तक्रार अशा प्रश्नाद्वारे सामाजिक सामंजस्य व सलोखा यांच्यावर बाधा येऊ शकते व तणाव निर्माण होऊ शकतो या कारणास्तव केलेली होती. या तक्रारीनंतर मुख्य हेतू दुर्लक्षित होऊन इतर मुद्द्यांवर काही जण राजकारण करून सामाजित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तक्रारीतील मूळ उद्देशच नष्ट होत आहे. त्यामुळे आपण ही तक्रार मागे घेत असल्याची माहिती श्री.पवार यांनी दिली. श्री.पवार यांनी ही तक्रार येथील अॅड.विशाल दीक्षित यांच्यामार्फत पोलिस अधीक्षकांकडे केली होती. त्यांच्यामार्फत ही तक्रार त्यांनी मागे घेतली आहे.
संपादन - गणेश पिटेकर