
सर्व गावकऱ्यांनी आणि नवनियुक्त सदस्यांनी दाम्पत्याचे अभिनंदन केले
अब्दीमंडी (औरंगाबाद): येथील सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक सोमवारी (ता. आठ) झाली. यात सरपंच व उपसरपंचपदी पती, पत्नी यांची निवड झाली. सरपंच व उपसरपंच पदासाठी केवळ एक- एक अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे ही निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.
सरपंच पदासाठी साबेर खान सिराज खान पठान व उपसरपंच पदासाठी त्यांच्या पत्नी शगुफ्ता साबेर पठाण यांचा अर्ज आला होता. दरम्यान, पती, पत्नीची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णायक निर्वाचन अधिकारी ए. बी. बडे यांनी घोषित केले.
मनात आलं आणि सायकल यात्रा करत तिरुपती गाठलं...!
यावेळी ग्रामसेवक एस. एम. चव्हाण, तलाठी एम. ए. मुळे, ग्रामपंचायत सदस्य संगीता लिंगे, लक्ष्मी खंडागळे, जहागीर पठाण, अमजत पठाण, यास्मीन बी सादिक, रूपेश सदावर्ते, फैमीदा मोबिन सय्यद, सुखदेव सोनवणे, बदरुन्निसा रब्बानी यांची उपस्थिती होती. माजी सरपंच शिवनाथ चौधरी, माजी उपसरपंच राजेंद्र पंडित, शेख हकीम, रफीक कुरैशी, राजिक कुरेशी, अमर हजारी, चेतन देवले, तौफिक कुरेशी, शेख सईद यांच्यासह दौलताबादचे सरपंच पवन गायकवाड, कल्याण कांजुने, सयद जमील यांनी नवनिर्वाचित सरपंच पती, पत्नीचा गौरव केला. यावेळी दौलताबाद ठाण्याचे पोलिस कर्मचारी डी. बी. तडवी, ए. एन. साबले यांनी बंदोबस्त ठेवला होता.
(edited by- pramod sarawale)