पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले

सुषेन जाधव
गुरुवार, 25 जून 2020

उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी (ता.२५) रोजी जिल्ह्यातील वैजापूर तालूक्यातील हनुमंतगाव, महालगाव आणि गंगापूर तालुक्यातील वाहेगाव या ठिकाणी विविध योजनेतील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र कृषी विभागाने जाणिवपूर्वक केवळ बहूभुधारक शेतकरी आणि संबंधित योजनांच्या लाभार्थ्यांच्या भेटी घडवून आणल्या, परंतू यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांशी संवाद का घडवून आणला नाही? अल्पभूधारकांना शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांपासून चार हात दूरच का ठेवले असा संतप्त सवाल करत शेतकऱ्यांनी कृषी विभागावर संताप व्यक्त केला आहे. 

औरंगाबाद: उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी (ता.२५) रोजी जिल्ह्यातील वैजापूर तालूक्यातील हनुमंतगाव, महालगाव आणि गंगापूर तालुक्यातील वाहेगाव या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (पोकरा),  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फळबाग लागवड, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ आदी योजनेतील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. 

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात 

मात्र कृषी विभागाने जाणिवपूर्वक केवळ बहूभुधारक शेतकरी आणि संबंधित योजनांच्या लाभार्थ्यांच्या भेटी घडवून आणल्या, परंतू यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांशी संवाद का घडवून आणला नाही? अल्पभूधारकांना शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांपासून चार हात दूरच का ठेवले असा संतप्त सवाल करत शेतकऱ्यांनी कृषी विभागावर संताप व्यक्त केला आहे. 

या पाहणी दरम्यान त्यांच्यासोबत आमदार रमेश बोरनारे, आरोग्य सभापती अविनाश गलांडे पाटील, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवर, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उप विभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्यासह महसूल, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीत असलेल्या शेती शाळेला मंत्री देसाई यांनी भेट देऊन प्रात्यक्षिकाची पाहणी केली. 

हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....

त्यानंतर वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे संपत शेळके यांच्या शेतातील शेततळ्याची पाहणी केली. बांधावर खते, बियाणे पुरवठा या मोहिमेतंर्गत येथील शेतकरी गटांनी खरेदी केलेल्या खताच्या गाडीस पालकमंत्री श्री. देसाई यांनी हिरवी झेंडी दाखवली. गंगापूर तालुक्याच्या वाहेगावातील संपत मनाळ यांच्या शेतातील पिकांची पाहणी, वाहेगाव येथील मच्छिंद्र मणाळ यांच्या कांदा चाळीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर वृक्षारोपन करण्यात आले.

हा हव्यास कशासाठी?

साधारण १५ दिवसापूर्वी कृषी विभागाने औरंगाबाद जिल्हा बांधावर खत वाटप करण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे स्पष्ट केले होते, मात्र त्यानंतर काही दिवसातच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांना पून्हा बांधावर खत वाटप करण्याच्या मोहिमेला हिरवी झेंडी दाखविण्यास भाग पाडले. हा हव्यास कशासाठी हा प्रश्‍न शेतकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा: आई आजारी, भावांचाही सांभाळ, कर्ता बनून आठवीतली शीतल देतेय कुटूंबाला आधार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Subhash Desai field Visit Aurangabgad News