कष्टाने पैसे जमविले पण हजचे स्वप्न भंगले 

शेखलाल शेख
सोमवार, 29 जून 2020

यंदा राज्यातून ज्यांचा नंबर लागला त्यामध्ये ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे १ हजार ९१० भाविक होते. ज्यांचा थेट हजसाठी नंबर लागतो तर १० हजार ४०८ भाविकांचा सोडतीत पहिल्यांदा नंबर लागला होता; तसेच विना मेहरम ३१ महिलांचासुद्धा हजसाठी नंबर लागलेला होता. यामध्ये मराठवाड्यातील ३,२०० तर औरंगाबाद जिल्ह्यातील ९३४ भाविक होते. नंबर लागलेला असल्याने या सर्वांनी हजला जाण्याची तयारी करीत हज समितीकडे ८१ हजारांचा पहिला तर १ लाख २० हजार रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला. सर्व काही सुरळीत राहिले असते तर भाविकांना जुलैमध्ये हजला जाता आले असते. तसेच ऑगस्ट मध्ये त्यांची यात्रा पूर्ण झाली असती. 

औरंगाबाद:  इस्लाम धर्मातील प्रमुख पाच स्तंभापैकी ‘हज’ एक महत्त्वाचे मानले जाते. आयुष्यात एकदा तरी हजला जाता यावे अशी प्रत्येक मुस्लीम व्यक्तीची इच्छा असते. हजसाठी अनेक जण कष्टाने एक-एक रुपया जमा करतात. मात्र, यंदा कोरोनामुळे हजला जाता येणार नाही. सौदी प्रशासनाच्या निर्णायामुळे महाराष्ट्रात जवळपास १२ हजार ३४९ भाविकांना नंबर लागूनसुद्धा हजला मुकावे लागणार आहे.

देशभरात जळपास १ लाख ७५ हजार भाविक हजला जातात. त्यापैकी १ लाख ४० हजार यात्रेकरुंचा कोटा केंद्रीय हज समितीकडे असतो. मात्र, सौदी प्रशासनाने कोरोनानेमुळे बाहेरील देशातील भाविकांना हजसाठी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदा कुणालासुद्धा हजला जाता येणार नाही.

हजला जाण्यासाठी मोठी तयारी केली जाते. हजला जाण्यापूर्वी नातेवाईक, मित्र परिवार यांना निमंत्रण दिली जाते. पाच प्रशिक्षणही घेतले जाते. मात्र, यंदा नंबर लागूनसुद्धा हजला जाता येणार नाही. कोरोनामुळे ही संधी हिरावल्याने अनेकांचा डोळ्यात पाणी आले. 

भाविकांनी जमा केले होते पैसे

यंदा राज्यातून ज्यांचा नंबर लागला त्यामध्ये ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे १ हजार ९१० भाविक होते. ज्यांचा थेट हजसाठी नंबर लागतो तर १० हजार ४०८ भाविकांचा सोडतीत पहिल्यांदा नंबर लागला होता; तसेच विना मेहरम ३१ महिलांचासुद्धा हजसाठी नंबर लागलेला होता. यामध्ये मराठवाड्यातील ३,२०० तर औरंगाबाद जिल्ह्यातील ९३४ भाविक होते.

हेही वाचा- औरंगाबादच्या प्रशासकांचा लोकप्रतिनिधींवर पलटवार

नंबर लागलेला असल्याने या सर्वांनी हजला जाण्याची तयारी करीत हज समितीकडे ८१ हजारांचा पहिला तर १ लाख २० हजार रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला. सर्व काही सुरळीत राहिले असते तर भाविकांना जुलैमध्ये हजला जाता आले असते. तसेच ऑगस्ट मध्ये त्यांची यात्रा पूर्ण झाली असती. 

लवकरच जमा करणार पैसे

हजला नंबर लागलेल्या भाविकांना हज समितीच्या खात्यात ८१ हजारांचा पहिला तर १ लाख २० हजारांचा दुसरा हप्ता भरलेला होता. मात्र, या यंदाची हज यात्राच होणार नसल्याने हज समितीकडून भाविकांचे पैसे परत देण्याची तयारी सुरू झालेली आहे. अर्ज करतानाच भाविकांनी त्यांच्या बँकेचा तपशील दिलेला आहे. त्यामुळे महिनाबरात प्रक्रिया पूर्ण करून देशभरातील भाविकांच्या खात्यात थेट खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. तसेच ज्यांच्या बँकेच्या खात्यात बदल असेल अशा भाविकांना हज समितीला ई-मेलद्वारे माहिती द्यावी लागणार आहे. 

आता ‘उमराह’ला जाण्याची इच्छा

ज्या भाविकांचा हजला नंबर लागत नाही असे बहुतांश भाविक हे ‘उमराह’साठी जातात. यंदा ज्या भाविकांचा नंबर लागला होता; मात्र कोरोनामुळे हजला जात येणार नसल्याने अशा भाविकांनी सर्वकाही सुरळीत झाल्यास भविष्यात ‘उमराह’ला जाण्याची तयारी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haj Yatra Cancelled Aurangabad News