VIDEO : हर्षवर्धन जाधव यांची दानवेंना आत्महत्येची धमकी, केले गंभीर आरोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

आता जाधव यांनी आज (ता. २९ मे) यूट्युबवर एक १९ मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करून सासरे तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या बाबत केद्रींय मंत्री रावसाहेब दानवेंशी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. 

औरंगाबाद ः कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी याच आठवड्यात राजकारणातून निवृत्ती घोषित केली. दरम्यान, त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, आता जाधव यांनी आज (ता. २९ मे) यूट्युबवर एक १९ मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करून सासरे तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या बाबत केद्रींय मंत्री रावसाहेब दानवेंशी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. 

 

‘‘मला जगू द्या आणि तुम्ही जगा. पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी जीव देईन आणि तुम्हाला अडचणीत आणीन,’’ अशी धमकी जाधव यांनी या व्हिडिओतून दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत जाधव म्हणाले, रावसाहेब दानवे हेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देत आहेत. मला जगू द्या आणि तुम्ही जगा. पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी जीव देईन आणि तुम्हाला अडचणीत आणीन, अशी धमकी जाधव यांनी या व्हिडिओतून दिली आहे. रावसाहेब दानवे हेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देत आहेत. मला जगू द्या आणि तुम्ही जगा. पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी जीव देईन आणि तुम्हाला अडचणीत आणीन, अशी धमकी जाधव यांनी या व्हिडिओतून दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
नेमके काय म्हटले?
रावसाहेब दानवे यांना उद्देशून असलेल्या या व्हिडिओत जाधव म्हणतात, की आमचे वैवाहिक संबंध आजपर्यंत नीट झालेले नाहीत. त्याचा प्रचंड त्रास झाला. २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेकडून ऑफर होती. पण, ती माझ्यापर्यंत पोचवली गेली नाही. कारण ती जबाबदारी तुमच्यावर (रावसाहेब दानवे) होती. मी त्याचवेळी आमदार झालो असतो. त्यावेळच्या निवडणुकीत मला बंगला विकावा लागला. त्यावेळी पडलो.

त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा निवडणुका आल्या. त्याहीवेळी पैसे नव्हते. आम्ही आमची मिटमिट्याची जमीन विकली. जी तुम्हीच घेतली. अत्यंत कमी दरात घेतली. आम्हाला गरज होती. त्यामुळे आम्ही काही म्हणालो नाही. २००९ मध्ये मी आमदार झालो. नंतर २०१४ ची निवडणूक जिंकली. तुम्हीच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देत आहेत. मला जगू द्या आणि तुम्ही जगा. पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी जीव देईन आणि तुम्हाला अडचणीत आणीन, अशी धमकी जाधव यांनी या व्हिडिओतून दिली आहे.
 
अनेक दिवसांपासून वाद
हर्षवर्धन जाधव हे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. जाधव यांनी राजकारणातून घेतलेल्या निवृत्तीमागेही कौटुंबिक वाद हे कारण असल्याची चर्चा होती. त्यावेळी कौटुंबिक वाद असल्याचे खुद्द जाधव यांनी व्हिडिओमध्ये मान्य केले होते. प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. तशा आमच्याही घरात झाल्या. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये. मी संजनाच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्राचे नेते रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली संजना निश्चितच उत्तुंग भरारी घेईल, असा विश्वासही जाधव यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshavardhan Jadhav Threats To His Father-in-Law