धड होते रेल्वेपटरीवर, शिर मात्र गायब! (वाचा कुठले प्रकरण)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

चंद्रकांत हा मंगळवारी (ता.25) रात्री साडेआठच्या सुमारास लहान भावासोबत छावणीत राहणाऱ्या मानलेल्या बहिणीकडे जाऊन येतो असे सांगून गेला. त्याला तिथे सोडून त्याचा लहान भाऊ दुचाकी घेऊन घरी परतला. चंद्रकांतला पाहुण्यांनी आपल्याकडे मुक्काम करावा असे सांगितले; पण चंद्रकांत तिथे थांबला नाही व पायी घराकडे निघाला. रात्री तो घरी न परतल्याने शोध सुरू झाला. बुधवारी सकाळी छावणीतील रेल्वे उड्डाणपुलाखालील लोहमार्गावर एक शिर नसलेला मृतदेह येणाऱ्या-जाणाऱ्यांना दिसला.

औरंगाबाद : मानलेल्या बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाचे धड छावणी उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर सापडले. ही घटना बुधवारी (ता. 25) सकाळी उघडकीस आली; पण गंभीर बाब म्हणजे त्याचे शिर गायब असून, ते अद्यापही सापडले नाही. त्यामुळे त्याचा खून झाला की ही आत्महत्या, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा- (व्हिडीओ पाहा) कर्जमाफी केली, पण शेतकरी म्हणतात........ 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, चंद्रकांत ऊर्फ चंदू सुरेश जाधव (वय 26, रा. गांधीनगर, रविवार बाजारजवळ) असे मृताचे नाव आहे. चंद्रकांत हा मंगळवारी (ता.25) रात्री साडेआठच्या सुमारास लहान भावासोबत छावणीत राहणाऱ्या मानलेल्या बहिणीकडे जाऊन येतो असे सांगून गेला. त्याला तिथे सोडून त्याचा लहान भाऊ दुचाकी घेऊन घरी परतला. चंद्रकांतला पाहुण्यांनी आपल्याकडे मुक्काम करावा असे सांगितले; पण चंद्रकांत तिथे थांबला नाही व पायी घराकडे निघाला. रात्री तो घरी न परतल्याने शोध सुरू झाला. बुधवारी सकाळी छावणीतील रेल्वे उड्डाणपुलाखालील लोहमार्गावर एक शिर नसलेला मृतदेह येणाऱ्या-जाणाऱ्यांना दिसला. त्यांनी या घटनेची माहिती छावणी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचले. त्यांनी मृतदेह घाटी रुग्णालयात नेला. त्यानंतर त्याच्या मृताच्या नातेवाइकांचा शोध सुरू झाला. चंद्रकांत सापडत नव्हता; पण रेल्वेरुळावरील मृतदेहाबाबत त्यांना समजल्यानंतर नातेवाइकांनी धाव घेतली असता तो चंद्रकांतचा मृतदेह असल्याचे समोर आले. 

हे वाचलंत का?-सहा महिन्याचं बाळ आईच्या कुशीत होतं.....पण काळही आला अन् वेळही आली...

अंगावर दुखापतही नाही 
मृताची अंगझडती पोलिसांनी घेतली. त्यावेळी त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली. तो चंद्रकांत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नातेवाइकांनीही घाटी रुग्णालयात धाव घेतली. मृताच्या अंगावर कोठेही दुखापत झालेली नाही. त्याच्या पायातही चप्पल तशीच आहे. त्याचा घातपात झाला असावा व नंतर मृतदेह रेल्वेरुळावर टाकला असावा असा संशय व्यक्त केला. 

क्लिक करा- लघुशंकेला ​आडोशाला जाताय? आधी दारुडा दिसतो का बघा...

हे झाले असावे.. 
मृताने आत्महत्या केली असावी. त्याचे शिर रेल्वेखाली अडकून लांबपर्यंत गेले असावे असा पोलिसांकडून अंदाज व्यक्त करण्यात आला; परंतु नातेवाइकांनी रुळाच्या दोन्ही दिशेने लांबपर्यंत शोध घेऊनही बुधवारी रात्रीपर्यंत मृताचे शिर सापडले नाही. या घटनेप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

हे वाचाच-औरंगाबादेतून लवकरच नविन विमानसेवा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The headless body was found on the railway track in Aurangabad