esakal | मराठवाड्यातील २१ महसुली मंडळात अतिवृष्टी, नद्यांना आला पूर
sakal

बोलून बातमी शोधा

Rain In Aurangabad District

औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत पावसाचा जोर सुरुच आहे.

मराठवाड्यातील २१ महसुली मंडळात अतिवृष्टी, नद्यांना आला पूर

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाडा विभागात पावसाचा जोर कायम आहे. धो-धो कोसळणाऱ्‍या या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शुक्रवारी (ता.२५) झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील विभागातील २१ महसुली मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील वाळूज मंडळात सर्वाधिक १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यातील शेंदुरवादा आणि चापानेर महसुली मंडळात अनुक्रमे ६५ व ७७ मिलिमीटर अतिवृष्टी झाली आहे.

अनेक वर्षांनी येळगंगा दुथडी भरून वाहिली, गावांचा तुटला संपर्क

शुक्रवारी रात्रभर झालेल्या या पावसाची एमजीएम केन्द्रात ३० आणि चिकलठाणा वेधशाळेत अठरा मिलिमीटर नोंद झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून मराठवाडा विभागात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. या संततधारेमुळे सर्व जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची शंभरी ओलांडली आहे. सर्वाधिक पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात १६७.९ टक्के झाला आहे.


संततधारेमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून ढग पडल्यागत पावसाच्या सरी कोसळत आहेत. वाळूज महानगर शुक्रवारी मध्यरात्री जोराचा पाऊस झाला. या मंडळात १०६ मिलिमीटर पावसाचे नोंद झाली आहे. पावसाचा हा जोर विभागात कायम आहे. एका दिवसात सरासरी १७.२ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

खामनदी पात्रातील दोनशे कुटुंबांना हलवले, औरंगाबाद महापालिकेने शाळेत केली...

एकाच दिवशी सर्वाधिक ४०.३ मिलिमीटर पाऊस संभाजीनगर जिल्ह्यात झाला आहे. केवळ हिंगोली वगळता आणि सातही जिल्ह्यात पावसाचा नोंद झाली आहे. विभागात पावसाचा जोर आणखीन दोन दिवस कायम राहील असे एमजीएम केंद्राचे श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. याचा फटका बीड, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांना बसण्याची शक्यता त्याने वर्तवली आहे. विभागात आज पर्यंत वार्षिक सरासरीच्या १ २० टक्के पाऊस झाला आहे.

सर्वात कमी नांदेड जिल्ह्यात १०१.८ टक्के पावसाची नोंद आहे. अन्य जिल्ह्यात झालेला एकूण पाऊस आणि त्याची टक्केवारी अशी, जालना- ६१६.२ (१५३.७), बीड - ५९ २.१ (११९.६ ) लातूर- ६९४.३ ( १०७.५), उस्मानाबाद +५९०.५ ( १०२.२), नांदेड -७७९.२ (१०१.८), परभणी -७४ ४.९ (१०८.४) आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये ७९०.६ (११ ९.३) पाऊस झाला आहे. कंसातील आकडे वार्षिक टक्केवारीचे आहेत.

खामनदीचे रौद्ररुप ; भावसिंगपुरा, कांचनवाडीत ढगफुटीचा थरार !

संपादन - गणेश पिटेकर