esakal | कोरोनाला दूर ठेवण्यासाठी अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

How to boost immunity Aurangabad News

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पुरेशी झोप घ्या. पाणी भरपूर प्या, असा सल्ला जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉ. अश्विन पाटील यांनी दिला.

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद - निव्वळ कोरोनामुळे मृत्यू होणारांची संख्या नगण्य आहे. कोणतेही आजार नसतील, रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोना संसर्गानंतरही धोका फार कमी आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पुरेशी झोप घ्या. पाणी भरपूर प्या, असा सल्ला जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉ. अश्विन पाटील यांनी दिला.

धकाधकीच्या, स्पर्धेच्या काळात आपण सारखे कामात गुंतून असतो. आपले वैयक्तिक जीवन आणि आरोग्याकडेही लक्ष नसते; परंतु कोरोनाच्या प्रदुर्भावाने आपण एकाच जागी थांबलो. हा काळ आपल्यासमोर संकट म्हणून उभा ठाकलाच आहे. असे असले तरीही याच काळाने आपल्याला स्वतःकडे पाहण्याचे शिकविले. कुटुंबाला वेळ देण्यापासून आपले वैयक्तिक जीवन, स्वतःचा शोध घेण्याचेही शिकविले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःसह कुटुंबाच्या आरोग्याप्रती जागरूक राहण्याची आपली वृत्ती वाढत आहे. त्यातूनच आपली रोगप्रतिकारशक्तीलाही आपण महत्त्व देत आहोत. 

'मीटर रिडींग घेऊ द्या, नाहीतर...'; महावितरण देणार वीजग्राहकांना 'शॉक!'
 
तरीही रोगप्रतिकारक्षमता असू शकते कमी 
रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी आजार तर कारणीभूत आहेतच; परंतु तुम्हाला मधुमेह नाही, उच्चरक्तदाबही नाही; पण तुम्ही व्यसनी आहात किंवा जेवणच करीत नाहीत. अथवा मद्यसेवन खूप करीत असाल, शरीराची ऊर्जा व्यर्थ गोष्टींसाठी खर्च होत असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असू शकते, असे डॉ. पाटील म्हणाले.  
 
अशी ओळखा इम्युनिटी

 • वातावरण बदलले की व्हायरल इन्फेक्शन लगेच होणे. प्रकृती बिघडणे. 
 • जेवणात कमी जास्त झाल्यास आजारी पडणे.
 • वारंवार आजारी पडत असाल तर आपली प्रतिकारक्षमता कमी आहे हे समजून घ्या.
 • सुदृढ व्यक्ती वातावरणात बदल झाला अथवा जेवणात कमी जास्त झाले तरी तरी आजारी पडत नाही.

 
ही आहेत कारणे

 • रात्र-रात्र जागणे, खूप उशिरा झोपणे.
 • अत्यंत कमी पाणी पिणे. 
 • जेवण व्यवस्थित नसणे.
 • शरीरातील ऊर्जा विनाकारण खर्च करणे.

 
या गोष्टी करा 

 • पुरेशी झोप घ्या. पाणी भरपूर प्या. 
 • या काळात फास्टफूड टाळा.
 • चांगला व सकस आहार घ्या. 
 • रात्र-रात्र जागणे टाळा.
 • तब्येत चांगली ठेवा.
 • व्यायाम करा.