मुलींच्या कोणत्या 'नखऱ्यां'वर मुलं फिदा होतात ... माहितीये का?

रोहित कणसे
Wednesday, 12 February 2020

मुलींच्या नेमक्या कोणत्या गोष्टी मुलांना आवडतात बरं? एका संशोधनानुसार, मुलांना मुलींमधील खालील गोष्टी प्रामुख्याने आवडतात, असे समोर आले आहे. 

कॉलेज लाईफमध्ये मुलींच्या मागे फिरणारी मुले नेमकं मुलींच्या कुठल्या गोष्टीवर भाळतात, हे सांगणं शक्य नाही. प्रत्येकाला एखाद्या व्यक्तीचे काही विशेष गुण आवडू शकतात. मुलांना त्यांच्या विशेष आवडी असतात. मुलींच्या नेमक्या कोणत्या गोष्टी मुलांना आवडतात बरं? एका संशोधनानुसार, मुलांना मुलींमधील खालील गोष्टी प्रामुख्याने आवडतात, असे समोर आले आहे. 

सेपिओसेक्शुअल 

एखाद्याच्या बुध्दीमत्तेवर भाळतील अशा मुली सर्व पुरुषांना आवडतात. ज्या मुलींना सामाजिक आणि राजकीय घडामोडींचे योग्य ज्ञान आहे, अशा मुली त्यांच्या हुशारीच्या जोरावर पुरुषांचं लक्ष वेधून घेतात. मला राजकारणात रस नाही असं म्हणणाऱ्या किंवा राजकारणाची चर्चा करणं आवडत नसणाऱ्या मुली सहसा मुलांना आवडत नाहीत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सवर लोक झाले फिदा

क्रिकेट, फुटबॉल प्रेमी

ज्या मुलींना क्रिकेट आणि फुटबॉल यापैकी कुठलातरी एक खेळ आवडतो, अशा मुलींसाठी पुरुषांच्या मनात वेगळाच आदर असतो. त्यांना त्याच्या आवडीच्या खेळाबद्दल चर्चा करयला कोणी भेटणार असेल तर ते बऱ्याच गोष्टी करायला तयार होतील. बुध्दीबळ आवडणाऱ्या मुलींपासून पुरुष दूर राहण्याची जाण्याची शक्यता देखील असते.

उत्तम केस असणाऱ्या 

ज्या मुली केसांची काळजी घेतात. आपले केस क्रिएटिव्हली हाताळतात, केशरचनेत तोचतोपणा नसतो, अशा मुली मुलांना जास्त आवडतात. सतत केस बांधून ठेवणं किंवा कायम मोकळे असणं मुलांना आवडत नाही. कधीतरी छान वेणी घालणाऱ्य़ा स्त्रीकडे पुरुष लवकर आकर्षित होतात.

स्पष्ट विचार 

स्पष्टपणे विचार मांडणाऱ्या मुली मुलांना अधिक आकर्षित करतात. पुरुषांचा बराचसा वेळ मुलींच्या मनातली गोष्ट समजून घेण्यात जातो. ती त्यांच्यासाठी सगळ्यात आवघड गोष्ट असते. मुलींचे स्पष्ट विचार असणे मुलांच्या फायद्याचे ठरते. 

धनंजय मुंडे यांनी जवानाला काढून दिलं विमानाचं तिकीट

धाडसी वृत्ती

धाडसी मुली सर्वच पुरुषांना आवडतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सैराट चित्रपटातील आर्ची हे पात्र. लोकांना तिचं धाडस आवडलं होतं. परिणामांचा फार विचार करत न बसणाऱ्या मुली पुरुषांना आवडतात.

तंत्रज्ञान प्रेमी

आजच्या काळात फार टेक्नोसॅव्ही नसणाऱ्या, पण नव्या येत असलेल्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती असलेल्या मुलींकडे मुलं लवकर आकर्षित होतात. सोशल मीडियाचा स्मार्ट वापर करणाऱ्या मुली लवकर मनात भरतात.

निखळ हसणाऱ्या

ज्या मुली योग्य त्या जागी निखळ हसतात अशा मुलींवर सगळे मुलं फिदा असतात. निखळ हास्य मुलांच्या मनावर पटकन बिंबते. त्याक्षणीच मुले प्रेमात पडण्याची दाट शक्यता असते. कसल्याही विनोदावर हसणाऱ्या मुलींपासून मुलं दूर राहणे पसंद करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How Boys Impress With Girls Aurangabad News