Video : पहा लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा तान्हाजी डान्स...

विकास गाढवे
Thursday, 13 February 2020

लातूर येथे नुकत्याच झालेल्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी साकारलेल्या तान्हाजीच्या भूमिकेची सोशल मीडियावर व राज्यभरात तुफान चर्चा सुरू आहे. तान्हाजीमुळे विभागीय स्पर्धेचे नाव राज्यभरात गेले. हा "तान्हाजी' रोजचे कामकाज सांभाळत व विभागीय स्पर्धेची तयारी करत श्रीकांत यांनी अवघ्या चार दिवसांच्या तयारीने साकारल्याचे पुढे आले आहे.

लातूर : येथे नुकत्याच झालेल्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी साकारलेल्या तान्हाजीच्या भूमिकेची सोशल मीडियावर व राज्यभरात तुफान चर्चा सुरू आहे.

तान्हाजीमुळे विभागीय स्पर्धेचे नाव राज्यभरात गेले. हा "तान्हाजी' रोजचे कामकाज सांभाळत व विभागीय स्पर्धेची तयारी करत श्रीकांत यांनी अवघ्या चार दिवसांच्या तयारीने साकारल्याचे पुढे आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे रागाने पाहून उदयभान साकारताना पेशकार विलास मलिशे यांनाही दिव्य पार पाडावे लागले. सलग दोन दिवस तयारी केली, तेव्हा कुठे पेशकारचा कलाकार होऊन त्यांना उदयभानची भूमिका साकारता आली.

येथे ता. 7 ते ता. 9 फेब्रुवारीदरम्यान झालेल्या विभागीय महसूल स्पर्धेची तयारी व खेळाडूंची व्यवस्था करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने चोख पार पाडली. एकीकडे ही जबाबदारी पार पाडताना दुसरीकडे स्पर्धेत सहभाग देण्यातही अधिकारी व कर्मचारी कुठेच कमी पडले नाहीत.

मग व्हायरल क्लिपमधला अमोल कोण...

क्रीडा स्पर्धेचा सराव करताना सांस्कृतिक स्पर्धेत वेगळेपण दाखवण्यासाठी श्रीकांत यांनी तयारी केली. स्पर्धेच्या चार दिवस आधी त्यांना सध्या गाजत असलेल्या तान्हाजी चित्रपटातील "शंकरा रे शंकरा' गीतावर सादरीकरण करण्याची संकल्पना सुचली. तेथून कलाकारांची जमवाजमव व तयारीला सुरवात झाली.

यावेळी क्रिकेट सरावाची वेळ विचारण्यासाठी मलिशे तिथे गेले व त्यांच्यात श्रीकांत यांना उदयभान सापडला. मलिशे हे अव्वल कारकून (पेशकार) असून उदयभानच्या रूपाने त्यांना श्रीकांत यांच्याकडे रागाने पाहण्याची भूमिका पार पाडायची होती.

साईबाबांच्या नंतर आता यांचा नंबर

सुरवातीला ताण आला व त्यानंतर रागाने पाहताना हसू येऊ लागले. "मी हसलो, साहेब हसायचे व भूमिकेसाठी प्रोत्साहनही द्यायचे. काय करावे ते सुचेना. साहेबांच्या डोळ्यांत डोळे घालून रागाने पाहायचे धाडस होत नव्हते. शेवटी डोळ्यांच्या सरळ रेषेत मागे नजर ठेवून डोळे मोठे करून भूमिका पार पाडली. यासाठी दोन दिवस लागले...' असे मलिशे यांनी सांगितले.

मोठी बातमी -  शीsss ! ते प्रवासी पीत होते ट्रेनच्या टॉयलेटमध्ये भरलेलं पाणी..

'ती' रायबा झालीच नाही!

श्रीकांत यांच्या पत्नी सोनम यांनीही तान्हाजीच्या सादरीकरणासाठी तयारी केली होती. तान्हाजीची पत्नी सावित्रीची भूमिका त्या करणार होत्या. तशी वेशभूषा साकारून स्पर्धेच्या ठिकाणी आल्या होत्या. यात श्रीकांत यांची मुलगी शाश्वती "रायबा'ची भूमिका करणार होती. मात्र, मी मुलगी आहे व मुलाची भूमिका करणार नाही, असे सांगत शाश्वतीने भूमिका करण्यास नकार दिला.

यामुळे सादरीकरणात सोनम व शाश्वतीच्या सहभागाने रायबाच्या लग्नाबाबत असलेला प्रसंग ऐनवेळी कापावा लागला. सोनम यांनी सावित्रीच्या भूमिकेत लावलेली उपस्थिती श्रीकांत यांना बळ, तर उपस्थितांना प्रेरणा देऊन गेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur District Collector Become Tanhaji Within Four Days