esakal | सतीश चव्हाणांच्या समर्थनार्थ अर्ज मागे घेतला, जयसिंगराव गायकवाड यांनी स्पष्ट केली भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

Jaisingrao Gaikwad

मी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, तो मी सतीश चव्हाण यांच्या समर्थनार्थ घेतला आहे. ७६ ते ७६ मराठवाड्यातील तालुक्यांमध्ये सर्व जाती धर्मातील, कार्यकर्त्यांची सर्वपक्षीय टीम माझ्याकडे आहे.

सतीश चव्हाणांच्या समर्थनार्थ अर्ज मागे घेतला, जयसिंगराव गायकवाड यांनी स्पष्ट केली भूमिका

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : मी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, तो मी सतीश चव्हाण यांच्या समर्थनार्थ घेतला आहे. ७६ ते ७६ मराठवाड्यातील तालुक्यांमध्ये सर्व जाती धर्मातील, कार्यकर्त्यांची सर्वपक्षीय टीम माझ्याकडे आहे. मी मराठवाड्याचा संपूर्ण दौरा करणार आणि सर्वांना विनंती करणार की सतीश चव्हाण यांना साथ द्या. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाला काम मागतो. आमदार की खासदारकी नव्हे, असे माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड म्हणाले.


त्यांनी मंगळवारी (ता.१७) भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ते बोलत होते.
आता मी नाराज नाही. मला काम लागते. मी तुमची पार्टी बांधून देतो. पदवीधर आणि राजीनाम्याशी संबंध नाही. परंतु ही योग्य वेळ आहे. सगळ माहित असूनही काम देत नाही. दहा दहा वर्ष हुंगणारच नसेल तर तेथे राहून काय करु ? पक्ष प्रवेश आताच नाही. मी सतीश चव्हाणांना  पाठिंबा देणार आहे. तुमची उपेक्षा होत आहे असे विचारले असता श्री गायकवाड म्हणाले, की पक्ष आता धनदांडग्यांचा झालेला आहे. पक्ष वाढवण्यासाठी काम केले आहे. हजारो लोकांना डावले गेले आहे.

संपादन - गणेश पिटेकर