esakal | Diwali 2020 : इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी दिवाळी ठरली बंपर
sakal

बोलून बातमी शोधा

2020_1image_14_55_440624403el-ll

बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवनात वाढत चालला आहे. त्यात सर्वात जास्त वापर हा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा होत आहे.

Diwali 2020 : इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी दिवाळी ठरली बंपर

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर मानवी जीवनात वाढत चालला आहे. त्यात सर्वात जास्त वापर हा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा होत आहे. मोबाईलपासून ते घरातील किचन पर्यंतच्या वस्तूही इलेक्ट्रॉनिक्सच्या आहेत. सण-उत्सावाच्या काळात या वस्तू खरेदीचा ट्रेड सुरु झाला आहे.

यंदा कोरोनामुळे सहा महिन्यापासून इलेक्ट्रॉनिक्स मार्केट बंद होते. यामुळे यंदाच्या हे मार्केट दरवर्षी प्रमाणे राहणार नसल्याचा दावा तज्ज्ञातर्फे व्यक्त केला जात होता. मात्र हिच बाब लक्षात घेत इलेक्ट्रॉनिक्स उपकरण तयार करणाऱ्या कंपन्या, शोरुम आणि पेंमट करणारे ॲप्स यांनी वेगवेगळ्या स्किम जाहीर केल्याने यंदाची दिवाळी इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत बंपर खरेदी विक्री सुरु आहे. कंपन्यांनी जाहीर केलेल्या या सवलतीचा मोठा फायदा घेताना ग्राहक दिसत आहेत. शहरात दसरा-दिवाळीला ४० ते ५० कोटींची उलाढाल होत असते. यंदा यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

यंदाच्या दिवाळीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मध्ये एलईडी टिव्ही, लोडिंग वॉशिग मशीन, मायक्रोवेव्ह यांना सर्वात जास्त पसंती आहे. यासह मोबाईल मध्येही नामांकित कंपन्यांच्या मोबाईलबरोबर गेल्या दोन ते तीन वर्षात उदयास आलेल्या कंपन्यांनाही मोठी पसंती मिळत आहे. जगासाठी भारत ही मोठी बाजारपेठ असल्याने जगप्रसिद्ध विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यातर्फे भारतात आपले उत्पादन वेगवेगळ्या ऑफर्ससह विक्रीसाठी उपलब्ध करत आहेत. वाजवी दरात हे उत्पादन आपल्याला मिळत असल्याने ग्राहकही याला मोठा प्रतिसाद देत आहेत.

दिवाळीत अशा आहेत ऑफर्स
इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नाव असलेल्या एलजी कंपनीने मोठी ऑफर्स दिल्या आहेत. यंदा कंपनीतर्फे ५ कोटींचा लक्की ड्रॉ घेण्यात येत आहे. २० हजाराच्या खरेदीवर ही ऑफर्स देण्यात येत आहेत. यासह शहर व जिल्‍ह्यातील इलेक्ट्रॉनिक्स दुकान चालकांतर्फेही वेगवेगळे गिफ्ट आणि वेगवेगळ्या उपकरणावर सवलत जाहीर केली असल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहेत. मोबाईल कंपन्यांनीही पाच ते सात हजार रुपयापर्यंत कँशबॅकची सुविधा देत आहेत. याशिवाय विविध बँकेतर्फे ऑनलाइन पेंमटवरही १५ ते १७ टक्के कॅशबॅक दिल्या जात आहे. त्याचप्रमाणे बजाज फायनन्सतर्फेही कँशबॅक देण्यात येत असल्याने तिहेरी फायदा ग्राहकांना होत आहे. यातून जवळपास २० हजारची खरेदी करणाऱ्यांना चार ते पाच हजारहून अधिक रुपयांची बचत होत आहे. यंदाच्या दिवाळीत कंपनीतर्फे देण्यात येत असलेल्या भरघोस सवलतीने ग्राहक सढळ हाताने खरेदी करत असल्याचे चित्र आहे.

मागणी असलेले उपकरणे
यंदा एलईडी टिव्ही, वॉशिग मशीन, एसी, मायक्रोवेव्ह, मोबाईल, होम थियएटर, फ्रिज, ओव्हन, घरगुती पीठाची गिरणी, मिक्सर, चपाती मेकर, इंडक्स यासह इतर उपकरणाला सर्वाधिक मागणी आहे. पुढे लग्नसराई सुरु होणार असल्याने अनेक ग्राहक त्याचा खरेदी दिवाळीतच करत आहेत. विविध कंपन्या आणि बँकांनी दिलेल्या या ऑफर्स दिवाळीपुरत्याच असल्याने अनेक जण ही संधी सोडत नसल्याचेही चित्र आहे. एकुणच परिस्थितीने शहर व जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक्स बाजारात पाय ठेवायलाही जागा नाही अशी परिस्थिती आहे. दिवाळीच्या निमित्ताने कोरोना काळात मरगळ आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला उभारी मिळाली आहे.

Edited - Ganesh Pitekar