esakal | एमजीएम रुग्णालयात ज्येष्ठावर दुर्मिळ शस्त्रक्रिया; चिरफाड न करता कॅथेटर टाकून हृदयाचे व्हॉल्व्ह रोपण
sakal

बोलून बातमी शोधा

heart surgery (1).jpg

एमजीएम वैद्यकीय रुग्णालयातील अँजिओप्लास्टीप्रमाणेच दुर्मिळ अशी कॅथेटर टाकून हृदयाचे व्हॉल्व्ह रोपण केले

एमजीएम रुग्णालयात ज्येष्ठावर दुर्मिळ शस्त्रक्रिया; चिरफाड न करता कॅथेटर टाकून हृदयाचे व्हॉल्व्ह रोपण

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी गंगापूर येथील ६० वर्षीय रुग्णाची चिरफाड आणि हृदय उघडे न करता अँजिओप्लास्टीप्रमाणेच दुर्मिळ अशी कॅथेटर टाकून हृदयाचे व्हॉल्व्ह रोपण केले. ही मराठवाड्यातील पहिली शस्त्रक्रिया असून रुग्ण ठणठणीत आहेत, अशी माहीती उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह डॉ. प्रशांत उदगिरे, डॉ. योगेश बेलापूरकर, डॉ. नागेश जांबुरे यांनी बुधवारी (ता.१०) पत्रकार परिषदेत दिली.

श्री. सूर्यवंशी म्हणाले, रुग्णास २ वर्षांपासून दम लागत असे. छातीत दुखणे, चक्कर येणे हा त्रासही होत होता. प्रारंभी रुग्णाने लठ्ठपणाबद्दल उपचार घेतले. परंतु टुडी इको, कलर डापलरच्या तपासणीतून रुग्णाला एओरटीक व्हॉल्व्ह आकाराने लहान झाल्याचे निदान झाले. त्यामुळे झडप उघडणे प्रतिबंधित होऊन शरीराच्या उर्वरित भागात रक्त प्रवाहात अडथळा होत होता. त्यामुळे ट्रान्सकॅथेटर एओरटीक व्हाल्व्ह रिप्लेसमेंट इंटरव्हेंशनल कार्डीओलाजीतील जटील शस्त्रक्रिया करण्यात आली. पारंपारिक उपचारात ओपन हार्ट शस्त्रक्रियेद्वारे झडप बदलली जाते. परंतु सदर रुग्णाची हृदय उघडे न करता झडप बदलण्यात आली.

औरंगाबादमध्ये मनसेने सहाय्यक आयुक्तांच्या टेबलावर टाकल्या गुटख्याच्या पुड्या

अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत उदगिरे, डॉ. योगेश बेलापूरकर, डॉ.अभिनव छाबडा, डॉ. राहूल पटणे, डॉ. सागर दिवेकर, डॉ. प्रितेश इंगोले, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. नागेश जांबुरे, डॉ. अजिता अन्नछत्रे यांनी ही शस्त्रक्रिया केली. 

धक्कादायक घटना! अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

"पेट्रोलपंपावर गेल्या ३४ वर्षांपासून काम करतो. मला दम लगत होता. तपासणी केल्यावर वॉल चोकअप झल्याचे कळले. अनेक ठिकाणी फिरल्यानंतर एमजीएममध्ये आलो. तेथे अँजिओप्लास्टी करावी लागेल, असे सांगण्यात आले. मात्र हे करताना कुठलीही चिरफाड न करता हे करावेत असे मी डॉक्टारांना म्हणालो होतो. त्यानुसार डॉक्टरांनी कुठलीही चिरफाड न करता हे ऑपरेशन केले. आता माझ्या गोळ्या बंद आहे. एवढेच नव्हे, तर चालताना दम लागत नाही. 
-रुग्ण, गंगापूर 

(edited by- pramod sarawale)