शेतकरी, बेरोजगांरासाठी राज ठाकरेंनी  मोर्चा काढायला हवा होता - इम्तियाज जलील 

शेखलाल शेख
Sunday, 9 February 2020

खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ""पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना राज्यातून, देशातून हाकललेच पाहिजे. आमचीही तीच भूमिका आहे; पण त्यासाठी मनसेला मोर्चा काढण्याची गरज नव्हती.

औरंगाबाद : राज ठाकरे यांना मुंबईत काढलेला महामोर्चा जर शेतकरी, बेरोगार तरुणांच्या प्रश्‍नावर काढला असता तर अधिक बरे झाले असते. पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलायलाच पाहिजे, याबद्दल कुणाचे ही दुमत असू शकत नाही; पण केवळ राजकीय स्वार्थासाठी मोर्चा काढून लोकांना वेठीस धरण्यासाठी केलेली ही स्टटंबाजी आहे अशा शब्दांत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

हेही वाचा : सिद्धार्थमधून जाणार मुंबईला दोन पिवळे वाघ 

मुंबईत मनसेच्या वतीने पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात महामोर्चा काढण्यात आला. खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ""पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना राज्यातून, देशातून हाकललेच पाहिजे. आमचीही तीच भूमिका आहे; पण त्यासाठी मनसेला मोर्चा काढण्याची गरज नव्हती.

क्लिक करा : पुणे मार्गावर धावणार इलेक्‍ट्रिक बस 

मुंबईत कुठे? किती घुसखोर आहेत? याची माहिती आपल्याला असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले होते. मग त्याच घुसखोरांचा व्हिडिओ सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला दाखवून हे काम करता आले असते; पण शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडली. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी केलेला राज ठाकरेंचा हा सगळा खटाटोप असल्याची टीकासुद्धा इम्तियाज जलील यांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: imtiaz jaleel raj thackeray mumbai morcha