गरीबांच्या घरातील चुली पेटत्या ठेवा - इम्तियाज जलील 

शेखलाल शेख
Wednesday, 25 March 2020

आम्ही सुद्धा गरीबांसाठी रेशनचे किट तयार केले असून त्यात तांदुळ, डाळी, तेल, साखर अशा जीवनावश्‍यक वस्तू आहेत. गरीबांच्या घरात कुणी ही उपाशी राहू नये यासाठी ही मदत कमी असली तरी सर्वांनी यासाठी पुढे येऊन मदत केली पाहिजे. तुमच्या आसपास कुणी ही उपाशी राहता कामा नये असे इम्तियाज जलील म्हणाले. 

औरंगाबादः  देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर झालेला आहे. पोलिस, डॉक्टर, नर्स, अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी सेवा बजावत आहेत. मात्र गरीब, कष्टकऱ्यांकडे २१ दिवसांचे धान्य घेण्याइतपत पैसे नसल्याने त्यांच्या घरातील चुली पेटत्या ठेवण्यासाठी आम्ही गरीबांना धान्य, जीवनावश्‍यक वस्तूंच्या किट देत आहोत.

मात्र या दिवसात जे व्यापारी चढ्या दराने जीवनावश्‍यक वस्तू विक्री करत आहेत ते कोरोना पेक्षा भयंकर असून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केली. लॉकडाऊन सुरु असल्याने त्यांनी सर्वांशी ऑनलाईन संवाद साधला.

हेही वाचा- औरंगाबादकरांसाठी महत्वाची बातमी

ते म्हणाले की, स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यक्ती यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गरीबांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सुद्धा गरीबांसाठी रेशनचे किट तयार केले असून त्यात तांदुळ, डाळी, तेल, साखर अशा जीवनावश्‍यक वस्तू आहेत. गरीबांच्या घरात कुणी ही उपाशी राहू नये यासाठी ही मदत कमी असली तरी सर्वांनी यासाठी पुढे येऊन मदत केली पाहिजे. तुमच्या आसपास कुणी ही उपाशी राहता कामा नये. 

चढ्या दराने मालाची विक्री 

लॉक डाऊन जाहिर झाल्यापासून दुकानांमध्ये गर्दी आहेत. मात्र काही व्यापारी एमआरपी पेक्षा जास्त दराने जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करत आहे. हे असले लोक कोरोना व्हायरस पेक्षा भंयकर आहे. आम्ही अशा लोकांची माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाला देणार आहोत. त्यांच्यावर छापे टाकून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

हेही वाचा- दारुसाठी बेवड्यांची गावांकडे धाव

बँकांचे, वित्तीय संस्थाचे हप्ते भरण्यासाठी सुट द्यावी 

लोक कामच करणार नाही तर पैसा कुठून येणार आहे. आलेल्या पैशांतून लोक त्यांच्या घराचे भाडे देतात. घेतलेल्या कर्जाच हप्ते भरतात. मात्र लॉकडाऊन मुळे बँकेच हप्ते भरण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे सरकारने यातून सुट, मुतदवाढ द्यावी. तसेच जे लोक घराचा किराया दिला नाही म्हणून तगादा लावत असतील तर अशा लोकांची आम्हाला माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imtiyaz Jaleel Addressing People Aurangabad News