esakal | मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का ? असं कोण म्हणाले
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का ? असं कोण म्हणाले

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्ष हजर न राहिल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांवरच निशाना साधला आहे.

मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का ? असं कोण म्हणाले

sakal_logo
By
शेखलाल शेख


औरंगाबाद: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्ष हजर न राहिल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांवरच निशाना साधला आहे. ‘मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास माझी अनुपस्थिती म्हणजे राष्ट्र विरोधी आणि शिवसेना अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का ? आता निष्ठेचे प्रमाणत्र देणारे आणि मिडीया गप्प का आहे ?’ असे ट्विट इम्तियाज जलील यांनी केले आहे. 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमाला आमदार असतांना अनुपस्थितीत राहिल्याने इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टिका झाली झाली होती. त्यानंतर आता खासदार असतांना ही ते या कार्यक्रमाकडे फिकरले नाही. गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर जोरदार टिका झाली होती.

त्यावेळी त्यांना अनेक खुलासे करावे लागले होते. मात्र आता कोरोनाचा संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला प्रत्यक्ष न येता ऑनलाईन सहभाग घेतला. तसेच ऑनलाईन संबोधन ही केले. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवर इम्तियाज जलील यांची ट्विटच्या माध्यमातून निशाचा साधला आहे.

हेही वाचा- मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण

पहिले ट्‍विट करत त्यांनी म्हटले की, ‘मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास माझी अनुपस्थिती म्हणजे राष्ट्र विरोधी आणि शिवसेना अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का ? आता निष्ठेचे प्रमाणत्र देणारे आणि मिडीया गप्प का आहे ?’ 

दुसरे ट्विट करत त्यांनी म्हटले की, ‘शिवसेनाअध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमास येण्यास स्पष्ट नकार दिला, मराठवाड्याबद्दल माझ्या सचोटी आणि निष्ठेवर प्रश्‍न विचारणारे मुख्यमंत्र्यांना का विचारत नाही, यालाच मी दुहेरी मापदंड म्हणतो.’ आता यावरुन सुद्धा राजकारण सुरु झाले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे.