अध्यक्ष महोदय मी ज्या मतदारसंघातून येतो तेथे सात दिवसाआड पाणी मिळते

शेखलाल शेख
Wednesday, 23 September 2020

मी ज्या मतदासंघातून येतो तेथे सात दिवस किंवा नऊ दिवसाआड पाणी मिळते. या वर्षी चांगला पाऊस झाला आहे. शहराला ज्या ठिकाणाहुन पाणी पुरवठा केला जातो ते जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र जायकवाडीतील पाणी ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या औरंगाबादसाठी पुरेशा प्रमाणात आज आणले जात नाही.

औरंगाबादः शहराला पाणी पुरवठा करणारे जायकवाडी जलाशय शंभर टक्के भरले आहे. गेट उघडून पाणी सोडले जात आहे तर दुसरीकडे औरंगाबाद शहरातील नागरीकांना सात आणि नऊ दिवसानंतर पाणी मिळत आहे. ७० वर्ष झाली तरी नागरीकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने औरंगाबादचा ‘हर घर जल’ यामध्ये समावेश करुन शहरातील पाण्याची समस्या सोडवावी असा मुद्दा खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत उपस्थितीत केला आहे.

इम्तियाज जलील लोकसभेत म्हणाले की, मी ज्या मतदासंघातून येतो तेथे सात दिवस किंवा नऊ दिवसानंतर पाणी मिळते. या वर्षी चांगला पाऊस झाला आहे शहराला ज्या ठिकाणाहुन पाणी पुरवठा केला जातो ते जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे.

भावी तलाठ्यांसाठी आनंदाची बातमी

मात्र येथील जायकवाडीचे पाणी ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या औरंगाबादेत पुरेशा प्रमाणात आणले जात नाही. आज गेट उघडुन पाणी नदीत सोडले जात आहे. मात्र शहराला सात दिवसानंतर पाणी मिळत आहे. औरंगाबादसाठी शासनाने १६८० कोटी रुपयांची योजना तयार केली आहे.

आज ७० वर्षानंतर सुद्धा शहराला सात दिवस, नऊ दिवसानंतर पाणी मिळत असेल तर ही चांगली बाब नाही. केंद्र शासनाने हर घर जल ही योजना आखलेली आहे. त्यासाठी केस स्टडी म्हणून आपण औरंगाबाद शहराला यात घ्यावे. येथे योजना तयार करुन पुढील दीड वर्षात शहराला दररोज पाणी मिळेल असे प्रयत्न करावे या शहराल या योजनेच्या माध्यमातून आम्ही पुरेसे पाणी दिले असे दाखवता येईल.

मी हात जोडुन विनंती करतो की सात दिवसानंतर जर लोकांना पाणी मिळत असेल तर आपल्यासाठी ही लाजीरवाणी बाब आहे. सात दिवसानंतर पाणी येत असल्याने महिलांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imtiyaz Jaleel Lok Sabha Aurangabad News